विदर्भ

न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूची व्हावी चौकशी

सकाळवृत्तसेवा

नागपूर - सीबीआयच्या मुंबईस्थित विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती ब्रिजगोपाल हरकिशन लोया यांच्या १ डिसेंबर २०१४ रोजी रविभवनात झालेल्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, अशी मागणी करणारी फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. याप्रकरणी २२ जानेवारीला सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.

याचिकाकर्त्याचे नाव योगेश ज्ञानेश्‍वर नागपुरे असून, ते पेशाने वकील आहेत. विविध वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या परस्पर विसंगती दर्शविणाऱ्या बातम्यांमुळे लोया यांच्या मृत्यूबद्दलचे गूढ वाढले आहे. बातम्यांवरून लोया यांच्या मृत्यूशी संबंधित कागदोपत्री पुरावे नष्ट करण्याचा वा मिटविण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. तसेच प्रकरणाशी संबंधित साक्षीदारदेखील प्रभावित केल्याचा संशय व्यक्त होत आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता साक्षीदारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. न्यायमूर्ती हे केवळ नागरिक नसून सार्वजनिक व्यक्तिमत्त्वदेखील आहे. त्यांच्या मृत्यभोवती निर्माण झालेले संशयाचे ढग न्यायपालिकेच्या विश्‍वासाला तडे देणारा आहे. यामुळे चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

लोया यांच्या मृत्यूशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा नागरिकांना हक्क आहे.  यामुळे संबंधित कागदपत्रांशी छेडछाड व्हायला नको, असेदेखील याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सादर करावी तसेच एसआयटीद्वारे तपास करण्याची मागणी याचिकेमध्ये केली आहे. याप्रकरणी गृह मंत्रालयाचे सचिव, नागपूरचे पोलिस आयुक्त, सदर पोलिस ठाणे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींना प्रतिवादी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT