विदर्भ

गंगा पुनरुज्जीवनासाठी पाच हजार कोटींचा निधी - गडकरी 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - देशाचे श्रद्धास्थान असलेल्या गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी आता ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) अंतर्गत पाच हजार कोटींचा निधी उभारणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 

हडस हायस्कूलच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. गडकरी म्हणाले, उत्तर भारताची जीवनदायिनी आणि पुराण काळापासून भारताच्या संस्कृतीचे अभिन्न अंग असलेली गंगा नदी आज प्रदूषित नद्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. मोदी सरकारने सत्तेत येताच गंगा शुद्धीकरणाला सुरुवात केली. मात्र, त्यात फारसे यश न आल्याने गंगा शुद्धिकरणाचे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी दोन महिन्यांआधी नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आली. गडकरींनीही गंगा नदी शुद्धीकरणाच्या दिशेने विविध पावले उचलली आहेत. यासाठी गंगेच्या उगमस्थानापासून दुतर्फा तब्बल दहा कोटी वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची माहिती गडकरींनी काही दिवसांआधीच दिली होती. त्यानंतर आता गंगा नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विविध संस्था, संघटना आणि गंगेवर श्रद्धा असणाऱ्यांकडून दान म्हणून पाच हजार कोटींची उभारणी केली जाणार असल्याचे गडकरी म्हणाले. मात्र, या कामांसाठी शासकीय निधीला हात न लावता पाच हजार कोटी रुपयांचा निधी गंगा पुनरुज्जीवनाच्या नावावर उभा करणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी पहिल्या टप्प्यात दोन दिवसांआधीच एक नामवंत जगविख्यात कंपनीच्या मालकांची चर्चा झाली असून त्यांनी वारासणी येथील संपूर्ण घाट नव्याने बांधून देण्यासह दोनशे ते तीनशे कोटींची मदत सामाजिक दायित्व कराराअंतर्गत करण्याचे आश्वासन दिल्याचे गडकरींनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT