40 percent of teachers staff consume kharra tobacco survey Gadchiroli
40 percent of teachers staff consume kharra tobacco survey Gadchiroli  sakal
नागपूर

गडचिरोली : ४० टक्के शिक्षक, कर्मचारी खातात खर्रा, तंबाखू; सर्वेक्षणाचा निष्कर्ष

केवल जीवनतारे ः @kewalsakal

नागपूर : नुकतीच गडचिरोली जिल्ह्यातील ११०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मौखिक आरोग्य तपासणी करण्‍यात आली. त्यापैकी ४० टक्के कर्मचारी व्यसन करीत असल्याचे आढळले असून यातील ७२.३ टक्के पुरुषांना तर ३८.६ महिलांना हिरड्यांचे आजार असल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात जिल्हा मौखिक अधिकारी तसेच सेवांतर्गत दंत परिवेष्ठनशास्त्र विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेले डॉ. संदीप पिपरे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील ३०६ महिला तर ७९४ पुरुष अशा एकूण ११०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी केली. या तपासणीतून ४०.४ टक्के लोक व्यसनाच्या विळख्यात अडकल्याचे आढळले. यात खर्रा खाणारे २२.४ टक्के पुरुष, तर तंबाखू खाणाऱ्या १४.५ टक्के महिला आढळल्या. सिगारेट ओढणाऱ्यांचे प्रमाण २.५ टक्के होते.

नक्षलग्रस्त गडचिरोलीतील कुरखेडा, सिरोंचा, भामरागड, आरमोरी, चामोर्शी, जमालगट्टा, लोहारा, पेरिमिली, जांबिया, तोडसा, घाटी, घायरापट्टी, कोटी, व्यंकटपूर, झिंगानूर, खमनचेरू, यंगलखेडा अशा गांवातील ५१ आश्रमशाळा व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तंबाखू, खर्रा आणि सिगारेटचे व्यसन मोठ्या प्रमाणात जडल्यामुळे हिरड्याचे आजार सुरू झाले.

हिरड्याची झीज होऊन दातांची मुळे उघडी पडतात. दातात फट पडणे. दात हलू लागणे, हिरड्यांना सूज येणे, रक्तस्राव होणे असे आजार आढळले. शासकीय दंत महाविद्यालयाच्या दंत परिवेष्ठनशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगेश फडनाईक, सहयोगी प्राध्यापक डॉ. वैभव कारेमोरे यांच्या मार्गदर्शनात हे संशोधन डॉ. पिपरे यांनी पूर्ण केले.

विकार पुरुष महिला

हिरड्याचे आजार ७२.३ टक्के ३८.६ टक्के

हिरड्याची झीज झालेले ३७ टक्के १४ टक्के

हिरड्यांमध्ये अन्न फसणे २५ टक्के ४० टक्के

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांसमोर आदर्श असतात. मात्र हे चित्र असेल तर विद्यार्थ्यांचा तोल व्यसनाधीनतेकडे जाऊ शकतो. या परिस्थितीला वेळीच आळा बसावा, यासाठी तंबाखू, खर्रा, बिडी, सिगारेट, दारू अशा व्यसनांपासून साऱ्यांनीच दूर राहावे. भावी पिढीला व्यसनांच्या विकारापासून दूर ठेवण्यासाठी हे सर्वेक्षण होते.

- डॉ. संदीप पिपरे, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी, शास. दंत महा. व रुग्णालय, नागपूर.

डॉ. पिपरे यांनी गुटखा व खर्रा सेवनामुळे होणाऱ्या हिरड्यांसह इतर आजारांचे निरीक्षण करून प्रबंध सादर केला आहे. विशेष असे की, नक्षलग्रस्त गडचिरोलीच्या दुर्गम भागातील कर्मचारी, शिक्षक यांच्यापर्यंत पोचून तेथील दंतआरोग्यातून दंत चिकित्सकांसमोरही आव्हान उभे केले आहे.

-डॉ. अभय दातारकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महा. व रुग्णालय, नागपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT