ajit pawar announce challenge fund for district in nagpur 
नागपूर

...अन् ५० कोटी मिळवा, अजित पवारांची खुली ऑफर

नीलेश डोये

नागपूर : उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्याला 'आव्हान फंड'अंतर्गत ५० कोटींचा निधी अतिरिक्त देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. जिल्हा नियोजन समितीचा निधी निश्चित करण्यासाठी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालय घेतली. यानंतर त्यांनी सर्व जिल्ह्यांनी सूत्रानुसार ठरल्यापेक्षा अधिकचा निधी देण्यात येणार असल्याचे सांगितले. 

उत्कृष्ट कार्यामध्ये डीपीसीचा निधी सर्वाधिक खर्च करणे, आयपास प्रणालीचा शंभर टक्के वापर, वेळेत प्रशासकीय मान्यता देणे, आश्वासित प्रगती योजना, नावीन्यपूर्ण योजना, समाजकल्याण, आदिवासी विभागाचा निधी वेळेत खर्च करणे आदी बाबींचा यात समावेश असणार आहे. निवड करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना असतील, असे त्यांनी सांगितले. 

कोरोनासाठी प्रत्येक जिल्ह्याला निधी देण्यात आला. परंतु, हा निधी खर्च झाला नाही, ८८७ कोटींचा निधी अखर्चित असून तो आरोग्यावर खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले. ४ व ५ मे २०२० च्या आदेश बऱ्याच प्रमाणात शिथिल करण्यात आला. राज्याच्या आर्थिक स्थितीनुसार, त्या अधिक शिथिलता आणण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

अखर्चित निधी स्थानिक संस्थांना - 
कोरोना व निवडणुकीमुळे यावर्षी निधी खर्च झाला नाही. हा निधी शासनाकडे परत जाऊ नये यासाठी तो स्थानिक संस्थांकडे वळता करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. 

निधीचा निर्णय मुंबईत - 
नागपूर, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्याचा निधीचा निर्णय मुंबईत होणार आहे. या जिल्‍ह्याचे पालकमंत्री नसल्याने हा निर्णय झाला नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 

वडेट्टीवारांना शुभेच्छा -
उपमुख्यमंत्री ओबीसी असावा असे वक्तव्य ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. विविध समाजाचे मेळावे होतात. समोर होणाऱ्या टाळ्यांचा प्रतिसाद पाहता, नेते बोलून जातात. त्यांना शुभेच्छा असल्याचे पवार म्हणाले. 

वैधानिक मंडळांना मुदतवाढ - 
विदर्भासह सर्व वैधनिक विकास मंडळांना मुदतवाढ देण्याची आमची इच्छा आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे यावर एकमत असल्याचे पवार यांनी सांगितले. 

गडचिरोली जिल्ह्याला नक्षलग्रस्त असल्याने अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे मेडिकल कॉलेज देण्याची मागणी करण्यात आली. याला वित्त मंत्री यांनी सकारात्कता दाखविली. 
-एकनाथ शिंदे, पालकमंत्री, गडचिरोली. 

असा मिळणार निधी -

  • भंडारा जिल्ह्याला १५० कोटी 
  • गडचिरोली जिल्ह्याला २७६ कोटी 
  • गोंदिया जिल्ह्याला १६५ कोटी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माहूर गडावरून परतताना भीषण अपघात! १०० फूट खोल दरीत टेम्पो कोसळला; यवतमाळच्या ३ भाविकांचा दुर्दैवी अंत

Aaryavir Sehwag Century : १९ चौकार, ८ षटकार! वीरूच्या लेकाचा जलवा, आर्यवीर सेहवागने १४३ चेंडूंत कुटल्या १७३ धावा...

Karveer Police Action : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर खुपिरेतील 'वरपे फार्म हाऊस'वर पोलिसांची धाड; अर्धनग्न अवस्थेत डान्स करणाऱ्या तीन तरुणांसह एका महिलेला घेतलं ताब्यात

Marathi News Live Updates: दसऱ्याच्या सुट्टीनंतर सर्वोच्च न्यायालयात 26 तारखेला सुनावणी, सीजेपी आणि काँग्रेसच्या आंदोलनाविरोधात व्यापारी संघटनांची याचिका

Tukaram Mundhe MPSC News : एमपीएससी पेपरफुटी चौकशी समितीच्या सचिवपदाचे तुकाराम मुंढेंना अधिकृत आदेशच मिळाले नाहीत; मुंढे नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT