police
police 
नागपूर

अन् त्याने बायकोला सोडून पोलिसाचीच केली पिटाई, भांडण सोडविणे पडले महागात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर :  नवरा-बायकोत सुरू असलेल्या भांडणामुळे त्रस्त झालेल्या वडिलांनी पोलिसांना फोन केला. घटनास्थळावर पोलिस पोहोचल्यानंतर त्यांचा वाद सोडवत असताना युवकाने पत्नीशी भांडण करणे थांबविले आणि पोलिस हवालदाराला झोडपणे सुरू केले. ही घटना आज गुरुवारी साडेनऊ वाजताच्या सुमारास कोलबास्वामीनगरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून युवकाला ताब्यात घेण्यात आले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन अनिल पारोचे हा पत्नी व आईवडिलासह कोलबास्वामी नगर, हजारीपहाड परिसरात राहतो. आज गुरुवारी सकाळी अनिलचा पत्नीशी वाद झाला. सकाळी आठ वाजतापासून दोघांमध्ये भांडण सुरू होते. दरम्यान, अनिलने पत्नीला दोनदा मारहाण केली. वडिलांवरही मारण्यासाठी धावला. शेजाऱ्यांनी हस्तक्षेप करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता अनिलने त्यांनाही शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला.

 नियंत्रण कक्षाने पोलिस हवालदार रोनाल्ड मार्टिन अँथोनी (वय 55) यांना घटनास्थळावर पाठवले. पोलिस हवालदार अँथोनी यांनी अनिलची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वडिलाशी चर्चा करीत असताना अनिलचा पारा चढला. त्याने थेट हवालदारावर हल्ला केला. अँथोनी यांनी अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने अनिलला गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी अँथोनी यांना मारहाण करण्यात आली. शेवटी कसेबसे करून अनिलला पोलिस ठाण्यात आणले. त्याच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT