file photo
file photo 
नागपूर

मैत्रीदिनाच्या शुभेच्छा देणे पडले महागात; मित्रांनीच केले हे...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : एका युवकाला मैत्रीदिनामित्त शुभेच्छा देणे चांगलेच महागात पडले. युवकावर चार मित्रांनी मिळून तलवारीने हल्ला केला. गळा चिरून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरा मातानगर परिसरात रविवारी मध्यरात्री १.४५ च्या सुमारास घडली. 

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. शुभम ऊर्फ लिंबू गजानन निंबुळकर (२३), नीलेश ऊर्फ बच्चा गुणवंता कालभुते (२५), नीलेश ऊर्फ क्लोमिक्स मांडस्कर (२५) सर्व रा. इंदिरा मातानगर आणि अन्य एक अशी आरोपींची नावे आहेत. श्याम ऊर्फ पाद्या राममूर्ती शर्मा (२३) रा. इंदिरा मातानगर असे फिर्यादीचे नाव आहे. आरोपी व फिर्यादींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. सर्व जण एकमेकांचे मित्र आहेत. श्याम हा संध्याकाळी ८.३० वाजता शुभमला भेटायला गेला. त्यावेळी त्याने मैत्रीदिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

शुभमने त्याला पोलिसांना आपल्यासंदर्भात माहिती पुरवल्याचा आरोप केला. यावरून दोघांत भांडण झाले. शुभम शिवीगाळ करीत असल्याने तो तेथून निघून गेला. रात्री जेवण करून घरी असताना आरोपी शुभमने त्याला एका ठिकाणी बोलावून घेतले. त्या ठिकाणी शुभम हा इतर आरोपींसह दारू पित बसला होता. पोलिसांना माहिती पुरविण्याचा आरोप करून आरोपींनी संगनमत करून श्यामच्या गळ्यावर तलवारीने वार केला. त्याने स्वत:चा बचाव केला व पळ काढला. यामुळे त्याचा जीव वाचला. श्यामने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT