Corona Booster Dose News sakal
नागपूर

दुसऱ्या डोसपासून नऊ महिने झाल्यास बूस्टर डोस

पहिल्या टप्प्यात आरोग्य, फ्रंटलाइन वर्कर्स, ६० वर्षांवरील नागरिक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरात उद्या १० जानेवारीपासून बूस्टर डोस (Booster dose) देण्यास सुरवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी(Health Officer), कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स तसेच विविध व्याधी असलेल्या ६० वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येईल. बूस्टर डोससाठी दुसरा डोस (second dose) घेतल्यानंतर नऊ किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेलेच पात्र ठरतील.(Corona Booster Dose News)

केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरवात झाली. शहरात १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्ष व त्यावरील व्यक्तींना बूस्टर डोस देण्याच्या मोहिमेला सुरवात करण्यात येणार आहे. १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी, कोव्हिडमध्ये आघाडीवर काम करणारे फ्रंटलाइन कर्मचारी आणि ६० वर्ष व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना लसीचे डोस देण्यात येणार आहेत.

दुसरा डोस घेतल्याच्या तारखेपासून ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेले नागरिक तिसऱ्या डोससाठी पात्र असतील. अशा पात्र ६० वर्षावरील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीचे ११९ स्थायी केंद्र उघडण्यात आले आहे. येथे १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविशिल्डचा पहिल्या आणि दुसरा डोस देण्यात येईल. तसेच कोवॅक्सिनसाठी २९ स्थायी लसीकरण केंद्र उघडण्यात आले आहे. ज्यांनी कोवॅक्सिन लस घेतली आहे, त्या ६० वर्षावरील नागरिकांना त्याचा बूस्टर डोस देण्यात येईल. तसेच येथे १५ वर्षावरील नागरिकांना पहिला व दूसरा डोस देण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT