भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन मागे घेणार का? आज निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP 12 MLA Suspended

भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन मागे घेणार का? आज निर्णय

मुंबई : भाजप आमदारांचं निलंबन (BJP 12 MLA Suspended) मागे घेण्याबाबत अर्ज करण्यात आला होता. आज त्या अर्जाची विधानसभा उपाध्यक्षांकडून (Maharashtra Assembly Deputy Speaker) दखल घेण्यात आली असून निलंबनाबाबत पुनर्विचार करण्यात येणार आहे. याबाबत आज दुपारी दोन वाजता बैठक घेण्यात येणार आहे.

हेही वाचा: शेंबडे आहेत, म्हणून १२ आमदार निलंबित केले - नितेश राणे

विधिमंडळाच्या जुलैमध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या आमदारांचे १ वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक खेचणे आणि तालिका अध्यक्षांना शिवीगाळ करणे, असे आरोप ठेवून गैरवर्तन करणाऱ्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर या आमदारांनी निलंबन मागे घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने निलंबन मागे घेण्यास नकार दिला होता. या आमदारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवून न्यायालयाने राज्य सरकार व विधिमंडळास बाजू मांडण्यास आपली भूमिका मांडण्यासाठी नोटीस बजावली होती. येत्या ११ जानेवारीला म्हणजेच उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे.

निलंबन मागे घेतलं जाणार? -

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या एक दिवसापूर्वी विधानसभा उपाध्यक्षांकडून दखल घेण्यात आली असून आज निलंबन मागे घेण्याबाबत पुनर्विचार करण्यात येणार आहे. यावेळी भाजप आमदार आशिष शेलार विधानभवनात उपस्थित राहणार आहेत. न्यायालयातील सुनावणीपूर्वी निलंबन मागे घेतलं जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कोणते आमदार झालेत निलंबित? -

आशिष शेलार, अभिमन्यू पवार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचं निलंबन करण्यात आलं होतं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bjp
loading image
go to top