नवे कोरोना नियम आजपासून लागू

शंभर टक्के अंमलबजावणीसाठी सरकारचा प्रयत्न; दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई
corona
corona sakal

मुंबई : कोरोनाचा संसर्ग (Corona)आणखी वाढू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यासाठी सरकार पातळीवर हालचाली सुरु आहेत. संचारबंदी (Curfew)आणि जमावबंदीच्या काळात विनाकारण पाचपेक्षा अधिकजण एकत्र येणाऱ्या आणि रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर नजर ठेवून कारवाई होणार आहे. तसेच, ५० टक्के क्षमतेच्या मर्यादाकडे दुर्लक्ष करून बिनधास्त व्यवहार करणाऱ्यांना धडा शिकविला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

corona
अखेर लसीकरण प्रमाणपत्रावरुन हटवला जाणार PM मोदींचा फोटो

लशींचे डोस(Vaccination) न घेतलेल्यांवरील बंधनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून कोरोना रोखण्यासाठी जाहीर केलेल्या नियम शंभर टक्के अमलात आणण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. कोरोनाविरोधातील नवे नियम रविवारी रात्री बारा वाजल्यापासून लागू होतील. त्यामुळे सोमवारी सकाळपासून खबरदारीच्या उपायांनुसारच व्यवहार सुरू राहणार आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसगणिक चिंता वाढवत असल्याने राज्य सरकारने नवी नियमावली तयारी केली आहे. विशेषत: पहाटे पाच ते रात्री ११ या वेळेत जमावबंदी आणि रात्री ११ ते पहाटे ५ या वेळांत संचारबंदी असेल. त्यातून अत्यावश्यक सेवा मात्र वगळल्या आहे. तर शाळा, महाविद्यालये, (दहावी-बारावीचे वर्ग वगळून) शिकवण्या बंद करून उर्वरित बहुतांशी व्यवहार ५० टक्के क्षमतेनेच सुरू ठेवण्याचा निर्णय घेऊन, रविवारी रात्रीपासून अंमलबजावणीचा आदेश काढला आहे.(new Corona rules)

corona
खाकी वर्दीवर रक्ताचा डाग; मद्यधुंद अवस्थेत डिलिव्हरी बॉयला उडवलं

कार्यक्रमांवर नजर

या नियमांची सर्वच पातळ्यांवर अंमलबजावणी व्हावी म्हणून विविध खात्याच्या राज्य आणि स्थानिक पातळीवरच्या प्रमुखांना सूचना केल्या आहेत. दुसरीकडे, लस घेण्याकडे दुर्लक्ष केलेल्यांना सेवा घेण्यास बंदी घालण्यात आल्याने त्याच्या अंमलबजावणीलाही प्राधान्य देण्याची तयारी सरकारने केली आहे. सरकारी, आणि खासगी कार्यालयांसाठी ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील, यासाठी प्रयत्न करण्याबाबतच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि अन्य यंत्रणांनी केली आहे. लग्न समारंभासह राजकीय, अराजकीय कार्यक्रमांच्या ठिकाणी पाहणी करून नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात येणार आहे.

दंड आकारणार

मॉल, नाट्यगृहे आणि चित्रपटगृहेही ५० टक्के क्षमतेनेच सुरू राहणार असून, हॉटेल, रेस्टॉरंटमधील सेवांची तपासणी होणार आहे. नियम मोडणाऱ्यांना पाच ते ५० हजार दंड ठोठावला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.(Maharashtra News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com