Dr. Mohan Bhagwat
Dr. Mohan Bhagwat Sakal
नागपूर

Dr. Mohan Bhagwat : भारतालाच नव्हे, जगातील समस्यांचे उत्तर देण्याची संघात क्षमता - डॉ. मोहन भागवत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सततच्या गुलामगिरीमुळे आपल्याला आत्मविस्मृती आली आहे. त्यामुळे आपण काय आहोत याबाबत स्पष्टता नाही. वास्तविक पाहता सर्वांना एका सुत्रात बांधण्याची शक्ती हिंदू समाजात आहे, हे आपण जाणून घ्यायला हवे.

भारतालाच नव्हे जगातील सर्व समस्यांचे उत्तर देण्याची क्षमता आपल्यात आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेयक संघाचे सर संघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. साप्ताहिक विवेकतर्फे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : हिंदुराष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या महर्षी व्यास सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ लेखक रमेश पतंगे, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आणि विचारांची व्याप्ती, विस्तार आणि परिणाम यांचा सखोल आढावा घेणारे हे पुस्तक आहे. त्याविषयी बोलताना डॉ. भागवत यांनी अशा प्रकारच्या अध्ययनाची अधिक गरज स्वयंसेवकांना असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकपर भाषणात रमेश पतंगे यांनी ग्रंथ निर्मितीमागील भूमिका स्पष्ट केली. वैयक्तिक गीत अमर कुळकर्णी यांनी सादर केले. निवेदन अश्विनी मयेकर यांनी केले. अवनी रानडे यांनी गायिलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाला संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी, अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर, विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे, रवींद्र भुसारी आदींची उपस्थिती होती.

१२५ वे वर्ष साजरे करू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात १९२५ मध्ये झाली. आज १८ एप्रिल २०२४ आहे. या दोन तारखांमध्ये मोठे अंतर आहे. काहीही साधन नसताना, विचारांची मान्यता नसताना, विरोधक चारही बाजूला असताना संघाची सुरवात झाल्याचे डॉ. मोहन भागवत म्हणाले. तेव्हाच्या कार्यकर्त्यांनी फार कठीण दिवस पाहिले.

प्रत्येक सरसंघचालकांच्या भाषणात त्या त्या काळचा उहापोह आहे. आज अनुकुलतेचा, सर्व साधन संपन्नतेचा काळ आहे. पुढील वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १२५ वे वर्ष साजरे करणार असल्याचे डॉ. भागवत यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळ यांच्या नाराजीवर तटकरेंचे ‘ऑल इज वेल’; प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी घेतली भुजबळांची भेट

Nupur Shikhare- Ira Khan : नुपूर शिखरेच्या आईचा बॉसी अंदाज; नवऱ्याची अवस्था पाहून आमिरची लेक म्हणाली...

SRH vs GT: सामना रद्द झाल्यानंतर काव्या मारन अन् विलियम्सनचं रियुनियन, सनरायझर्स हैदराबादन शेअर केला खास Video

VIDEO: पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत भर कार्यक्रमात गैरवर्तन; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "दहा हजारपेक्षा जास्त लोकांचा जमाव..."

Latest Marathi News Live Update : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे

SCROLL FOR NEXT