Crime News
Crime News Team eSakal
नागपूर

'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या जोडप्यात वाद; प्रेयसीला जबर मारहाण

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणारी प्रेयसी घरात बडबड करीत असल्यामुळे चिडलेल्या प्रियकराने एका बुक्कीत प्रेयसीचा दात पडला. दात हातात घेऊन ती पोलिस ठाण्यात गेली. पोलिसांनी लगेच तिच्या प्रियकराविरूद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित प्रीती म्हसके (३६) ही कपिलगनरात राहते. तिच्या पतीचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले. तिला एक १३ वर्षांची मुलगी आहे. ती उदरनिर्वाह चालविण्यासाठी फुटपाथवर कपडे विक्रीचा व्यवसाय करते. तिची ओळख प्रणय राजू गजभिये (३१) याच्याशी झाली. प्रणय हा मनपामध्ये कंत्राटी सफाई कामगार आहे. दोघांचे सूत जुळले. त्यांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला. प्रणयनेही तिला तिच्या मुलीसह स्वीकारण्याची तयारी दर्शविली. दोघेही गेल्या सात वर्षांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. दोघांत चांगले पटत होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून तो दारू प्यायला लागला. त्यानंतर तो तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला.

एका बुक्कीत पाडला प्रेयसीचा दात

प्रितीची आई घरी आल्यानंतर चिडचिड करून तिच्याशी भांडण करायचा. शनिवारी सायंकाळी सहा वाजता प्रणय घरी आला. त्यावेळी प्रीतीने घरात बडबड सुरू केली. त्यामुळे प्रणय चिडला. त्याने प्रितीला दोनदा वार्निंग देत गप्प करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती गप्प न बसता बडबड करीत होती. त्यामुळे प्रयणने रागाच्या भरात प्रीतीच्या तोंडावर बुक्की मारली. त्यात तिचा दात तुटून हातात आला. तिने थेट पोलिस स्टेशन गाठून प्रियकराविरूद्ध तक्रार केली. पीआय अमोल देशमुख यांनी तक्रार ऐकून घेत गुन्हा दाखल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT