esakal | गद्दारांना तिथेच दोन लावा, पोलिस केसेसचं मी पाहतो - सुनील केदार
sakal

बोलून बातमी शोधा

गद्दारांना तिथेच दोन लावा, पोलिस केसेसचं मी पाहतो - सुनील केदार

गद्दारांना तिथेच दोन लावा, पोलिस केसेसचं मी पाहतो - सुनील केदार

sakal_logo
By
नामदेव कुंभार

नागपूर काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सुनील केदार आणि आशिष देशमुख पुन्हा एकदा समोरासमोर येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांनी नागपूरमध्ये एका सभेत बोलताना अप्रत्यक्षपणे आशिष देशमुख यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. केदार यांनी आक्रमक भूमिका घेत कार्यकर्त्यांना प्रक्षोभक सूचना दिल्या. या सभेत बोलताना केदार म्हणाले की, 'पक्षाचा कितीही मोठा नेता काँग्रेससोबत बेईमानी करीत असेल तर गद्दारांना तिथेच गाडीतून ओढा व दोन लावा. पोलीस केसेस मी पाहून घेतो.' गेल्या काही दिवसांपासून देशमुख आणि केदार या दोन नेत्यांमधील वाद अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. यामुळे काँग्रसला नागपूरात नुकासानही झालं आहे. केदार यांच्या या वक्तव्यावर देशमुख काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागलं आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुकीच्या संदर्भात रविवारी झालेल्या आढावा बैठक जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. यास मंत्री सुनील केदार, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, नाना गावंडे, उपाध्यक्ष किशोर गजभिये, युथ काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुल सिरीया, कुंदा राऊत, सभापती नेमावली माटे यांच्यासह २०० वर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी केदार यांनी अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडलं. यावेळी बोलताना केदारी म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार लढत असताना कुणी अडथळा आणला, तर सोडू नका. काँग्रेसची पदे भोगायची व कुणीतरी मोठा माणूस माझ्या मागे आहे म्हणून मी वाटेल ते करील, अशी भूमिका घेणाऱ्याला दोन लावा. वाटल्यास मला फोन करा. मी मंत्रिपद बाजूला ठेवून येईल. काही चिंता करायची नाही. हा पक्ष तुम्ही आम्ही सर्वांनी उभा केला आहे. केदार यांचा रोख आशीष देशमुख यांच्याकडे असावा, असा अंदाज उपस्थितांनी बांधला.

आशिष देशमुखांची पक्षातून हकालपट्टी करा -

पशुसंवर्धन व क्रीडा मंत्री सुनील केदारांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करून काँग्रेसची जाहीर बदनामी करणाऱ्या माजी आमदार तसेच नवनियुक्त प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमेटीच्या बैठकीत करण्यात आली. तसा ठरावही बैठकीत घेण्यात आला. रविवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत पक्षातून निलंबित केलेल्या गज्जू यादवांना सोबत घेऊन फिरणारे पालकमंत्री नितीन राऊत यांच्यावरही कारवाई करण्याची करण्यात आली. राहुल सिरीया यांनी आशिष देशमुख यांना पक्षातून बाहेर काढण्यात यावे, यासंदर्भात बैठकीत प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला काँग्रेसच्या हिंगणा विधानसभा अध्यक्ष कुंदा राऊत यांनी अनुमोदन केले. दरम्यान लोंढे यांनी प्रस्तावावर मत मागितले. यावेळ ३० ते ४० टक्के कार्यकर्त्यांनाची हात वर केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर हा प्रस्ताव पारित करण्यात आला. विशेष म्हणजे देशमुख व राऊत हे दोघेही केदार विरोधक आहेत. त्यामुळे बैठकीच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.

loading image
go to top