Home guard girl front the police officers house Attempt to Self immolation Seriously injured  sakal
नागपूर

होमगार्ड युवतीचा पोलिस कर्मचाऱ्याच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

उपचाराकरिता नागपूर रुग्णालयात दाखल

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : येथील गृहरक्षक दलात कार्यरत असलेल्या एका युवतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या (Police officers)घरासमोर जाळून घेतले. ही घटना रविवारी (ता. नऊ) रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. ही युवती यात गंभीर भाजल्याने तीला उपचाराकरिता नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे.

रविवारी रात्रीच्या सुमारास पिपरी (मेघे) येथील वसाहतीत वास्तव्यास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासमोर येत या युवतीने वाद घातला. यावेळी कोणाच्या काही लक्षात येण्यापूर्वीच तिने अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेतले. हा प्रकार आसपासच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तीच्या अंगावर पाणी टाकत आग विझवली. सदर युवती

यात ही युवती गंभीर भाजली असल्याने तिला पोलीस विभागाच्या वतीने तत्काळ नागपूर येथे रवाना करण्यात आले. या गृहरक्षक युवतीने एवढा टोकाचा निर्णय का घेतला याचे कारण काळू शकले नाही. या संदर्भात पोलीस विभागात विविध चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.

अद्याप तक्रार नाही

या घटनेची अद्याप पोलिसात तक्रार करण्यात आली नाही. यामुळे असयाप कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने पोलिसंकडून सांगण्यात आले आहे. सदर युवतीचे बयान नोंदविण्यासाठी कर्मचाऱ्याला रवाना केले असता ती युवती बोलण्याच्या स्थितीत नसल्याची माहिती रामनगरचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांनी दिली.

तो कर्मचारी विवाहित

ज्या कर्मचाऱ्याच्या घरासमोर वाद करीत या युवतीने जाळून घेतले तो विवाहित असल्याची माहिती पोलिस विभागाकडून मिळाली आहे. यामुळे ही घटना नेमकी कशातून घडली याबाबत विविध चर्चा आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा केला पंचनामा

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत जखमी युवतीला रुग्णालयात रवाना केले आणि घटनास्थळाचा पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

SCROLL FOR NEXT