रॉस टेलरची एन्ट्री होताच बांग्लादेशच्या खेळाडुंनी दिला गार्ड ऑफ ऑनर

रॉस टेलरची एन्ट्री होताच बांग्लादेशच्या खेळाडुंनी दिला गार्ड ऑफ ऑनर
Summary

अखेरच्या कसोटीसाठी फलंदाजीसाठी मैदानात येतानाचे क्षण रॉस टेलरसाठी अविस्मरणीय असे ठरले.

बांगलादेश (Bangladesh) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दुसऱी कसोटी ख्राइस्टचर्चमध्ये होत आहे. ही कसोटी न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटपटू रॉस टेलरसाठी खास अशी असणार आहे. न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी असा फलंदाज असलेल्या रॉस टेलरचा हा शेवटचा कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे रॉस टेलर (Ross Taylor) जेव्हा मैदानावर फलंजदाजीसाठी उतरला तेव्हा बांगलादेशच्या खेळाडूंनी त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला.

अखेरच्या कसोटीसाठी फलंदाजीसाठी मैदानात येतानाचे क्षण रॉस टेलरसाठी अविस्मरणीय असे ठरले. मैदानात न्यूझीलंडच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं. यात प्रतिस्पर्धी संघ बांगलादेशच्या खेळाडुंनीसुद्धा रॉस टेलरला गार्ड ऑफ ऑनर दिला. याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

दरम्यान, अखेरच्या कसोटीतील पहिल्या डावात रॉस टेलरला फारशी चमक दाखवता आली नाही. त्यानं ३९ चेंडूत २८ धावांची खेळी केली. यामध्ये त्यानं चार चौकार मारले. टेलरला इबादत हुसैनने शोरिफुल इस्लामकडे झेल देण्यास भाग पाडलं.

रॉस टेलरची एन्ट्री होताच बांग्लादेशच्या खेळाडुंनी दिला गार्ड ऑफ ऑनर
बुद्धिबळ पटावरचा नवा राजा; भरत सुब्रमण्यम भारताचा 73 वा Grandmaster

रॉस टेलरनं ३० डिसेंबरला निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानं बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका शेवटची असेल असं म्हटलं होतं. ३७ वर्षीय रॉस टेलरने आतापर्यंत ११२ कसोटीमध्ये २३३ एकदिवसीय आणि १०२ टी २० क्रिकेट सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व केले. कसोटीमध्ये त्यानं ४४.६६ च्या सरासरीने ७ हदार ६८३ धावा केल्या. यात १९ शतकं आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com