How Nagpur mahapalika will collect tax in low employees 
नागपूर

तुकाराम मुंढे साहेबऽऽ, शिस्तीचाच बडगा उगारणार का? हे करून दाखवा बर...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागरिकांकडून कर वसुलीसाठी आता अधिकाऱ्यांना रविवार तसेच सुटीच्या दिवशीही काम करावे लागणार आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामासोबत सुटीच्या दिवशीही कामाचे दडपण दिसून येत आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यापुढेही तोकड्या मनुष्यबळाचे आव्हान आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारकडे धूळखात असलेल्या मनपाच्या पदभरतीचा प्रस्ताव ते मंजूर करण्याचे कौशल्य दाखविणार की मागील आयुक्तांप्रमाणेच सर्वसाधारण काम करीत नागपुरातून जाणार, असा प्रश्‍न चर्चिला जात आहे. 

महापालिकेत दर महिन्याला 20 ते 25 अधिकारी व कर्मचारी निवृत्त होत असून, अनेकांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी मनपा सभागृहाने 17 हजार पदांचा आकृतिबंध मंजूर करून सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. मात्र, दोन वर्षांपासून हा प्रस्ताव धूळखात आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेत येताच शिस्तीचा बडगा उगारला. आधीच तोकड्या मनुष्यबळामुळे कामाचा ताण असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आता आयुक्तांच्या कारवाईचेही दडपण आहे.

आयुक्तांनी शिस्त लावावी, परंतु तोकड्या मनुष्यबळाचा विचार करता शासनाकडून पदभरतीचा प्रस्ताव मंजूर करून आणण्याचे कौशल्यही दाखवावे, अशी चर्चा आता अधिकाऱ्यांत रंगली आहे. शहरात स्वच्छतेवर भर दिला जात आहे. परंतु, 17 हजार पदांच्या आकृतिबंधात सफाई कर्मचाऱ्याची 8,660 पदेही रखडली आहे. अधिकाऱ्यांकडून आयुक्तांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अधिकाऱ्यांच्याही आयुक्तांकडून पदभरतीच्या अपेक्षा आहेत. परंतु, आयुक्तांपुढे बोलणार कोण, असा प्रश्‍न आहे. 

सत्ताधाऱ्यांनी याबाबत पाठपुरावा करणे गरजेचे आहे. मात्र, विकासकामे रोखल्याने सत्ताधारीच गलितगात्र झाल्याचे चित्र आहे. आयुक्तांनी आता पदभरतीकडे लक्ष देण्याची गरज काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. परंतु, मनपाचे उत्पन्न यात अडथळा ठरत असल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले. संपूर्ण आकृतिबंधानुसार भरती केल्यास महापालिकेवर 50 कोटी रुपये प्रतिमहिन्याचा ताण पडण्याची शक्‍यता आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असून, उत्पन्नवाढीसाठी आयुक्तांनी कुठलेही प्रयत्न केले नसल्याबाबतही आश्‍चर्य व्यक्त होत आहे. मनपाचा आकृतिबंध केवळ औपचारिकता ठरू नये, अशी अपेक्षा अधिकारी करीत आहेत.

आकृतिबंधातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या

शासनाकडे प्रलंबित आकृतिबंधात पदांची संख्या 17 हजार 334 आहे. यात उपायुक्तांची 7, शहर अभियंता 9, कार्यकारी अभियंता (स्थापत्य)-28, प्रोजेक्‍ट मॅनेजर -1, उपअभियंता (स्थापत्य) -94, कनिष्ठ अभियंता 302, निरीक्षक-233, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक-448, मलेरिया सर्व्हे वर्कर-100, सुरक्षारक्षक-440, क्षेत्र कर्मचारी-500, रोड सफाई कर्मचारी-8660, पोलिस कॉन्स्टेबल-45 यासह अन्य पदांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT