वडिलांची प्रकृती खराब झाली अन्‌ रुग्णालयातील महिलेशे जुळले सुत, मग केले हे...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 मार्च 2020

सय्यदने महिलेला लग्नाचे आमिष दिले. प्रेमात आकंठ बुडालेल्या महिलेने होकार दिला. याचाच फायदा घेत सय्यदने तिच्याकडून सोन्याचे दागिने, गाडी आणि नगदी असे एकूण 20 लाख 40 हजार रुपये उकळले. काही दिवस प्रेमाचे नाटक केल्यानंतर लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे समजताच महिलेने धंतोली पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

नागपूर : अचानक प्रकृती खराब झाल्यामुळे युवक वडिलांना दवाखान्यात घेऊन गेला. त्याने वडिलांना रुग्णालयात दाखल केले. यामुळे सतत रुग्णालयात जावे लागत होते. अशात त्याची ओळख महिलेशी झाली. दोघांचे रोजच बोलणे होत होते. त्यांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक दिल्याने घरूनही बोलणे व्हायचे. युवकाने महिलेला प्रेमाचा जाळ्यात ओढून गंडविले. सय्यद मुक्तार (रा. मानकापूर) असे आरेपी प्रियकराचे नाव आहे. विशेष म्हणजे महिला दोन मुलांची आई आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2015 पासून 35 वर्षीय महिला शहरातील एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. तिचे लग्न झाले असून, दोन मुलांची आई आहे. दरम्यान ऑटोचालक सय्यद मुक्‍तार हा आपल्या बिमार असलेल्या वडिलांना महिला कार्यरत असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आला. वडील रुग्णालयात भरती असल्याने रोज रुग्णालयात ये-जा करीत होता. यादरम्यान सय्यदची ओळख रुग्णालयात कार्यरत महिलेसोबत झाली.

जाणून घ्या - पोलिसांनी थांबविली तरुणाची मोटारसायकल अन्‌ उघडकीस आला हा प्रकार... 

महिला सय्यदच्या वडिलांच्या प्रकृतीची माहिती घेत होती. यामुळे त्यांचे रोजच बोलणे व्हायचे. अशात दोघांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेतला. दोघांचेही मोबाईलवरून वारंवार चॅटिंग आणि बोलणे होत गेले. यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री झाली. काही दिवसांनी मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यामुळे ते कोणत्या ना कोणत्या कारणावरून भेटत गेले. वारंवार त्यांच्या भेटीगाठी होत होत्या. 

अशातच सय्यदने महिलेला लग्नाचे आमिष दिले. प्रेमात आकंठ बुडालेल्या महिलेने होकार दिला. याचाच फायदा घेत सय्यदने तिच्याकडून सोन्याचे दागिने, गाडी आणि नगदी असे एकूण 20 लाख 40 हजार रुपये उकळले. काही दिवस प्रेमाचे नाटक केल्यानंतर लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे समजताच महिलेने धंतोली पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. परदेशी यांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासानंतर पोलिसांनी सय्यद याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा - काय राव कसं काय? त्याने मारली शेतमजुराच्या पाठीवर थाप

मुलांचा स्वीकार करण्याची दाखवली होती तयारी

ऑटोचालक सय्यदने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर लग्नाचे आमिष दिले. तसेच तिच्या दोन्ही मुलांचा स्वीकार करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे महिलेचा सय्यदवर विश्‍वास बसला. यामुळे सय्यद तिच्या घरी नेहमी येत-जात होता. प्रेमात फसल्यानंतर सय्यदने तिला दुचाकी घेण्यासाठी 70 हजार रुपये मागितले. तिनेही होणारा पती असल्यामुळे त्याला पैसे दिले. त्यानंतर तो पैशाची मागणी करीत राहिला. तीसुद्धा त्याला वेळोवेळी पैसे देत गेली. आतापर्यंत त्याने सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल 20 लाख 40 हजार रुपये महिलेकडून उकळले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 lakh fraud of a woman at Nagpur