Nana Patole Esakal
नागपूर

Nana Patole: निमंत्रणच नाही बैठकींना यायचे कसे? नागपूर काँग्रेसमधली धुसफूस प्रदेशाध्यक्षांकडे

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल

रुपेश नामदास

नागपूर: देवडिया काँग्रेस भवनात होणाऱ्या शहर काँग्रेसच्या बैठकांचे निमंत्रण विशिष्ट गटाच्या पदाधिकाऱ्यांनाच दिले जाते. काही पदाधिकारी येऊ नये अशीच व्यवस्था येथे तयार करण्यात आली आहे. त्यामुळे अनुपस्थित राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांऐवजी जे बैठकांना बोलावत नाही त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

देवडिया भवन येथे गुरुवारी झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनुपस्थित पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. बैठकांना दांड्या मारणाऱ्या आणि देवडिया भवनमध्ये जाणीवपूर्व येण्यास टाळटाळ करणाऱ्यांचा अहवाल पाठवण्याचे निर्देश त्यांनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांना दिले.

याउपर जाऊन पटोले यांनी जे देवडियात येणार नाही त्यांना तिकीट दिले जाणार नाही असाही इशारा दिला. त्यामुळे चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे गुरुवारच्या बैठकीला

निमंत्रणाशिवाय देवडियातील बैठकांना यायचे कसे?

माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, तानाजी वनवे, प्रफुल्ल गुडधे व त्यांचे समर्थक अनुपस्थित होते. काही नेत्यांनी सुमारे पाच वर्षांपासून देवडियाची पायरीसुद्धा चढलेली नाही. मुत्तेमवार-ठाकरे गटाच्या विरुद्ध राऊत-चतुर्वेदी असा आपसी संघर्ष अनेक वर्षांपासून शहरात सुरू आहे.

या संदर्भात बैठकीला काही अनुस्थिती पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता ते म्हणाले, आम्हीच प्रदेशाध्यक्षांकडे बैठकांना बोलवल्या जात नसल्याची तक्रारी आहे. त्यांच्यावर आधी कारवाई करण्याची गरज आहे. आम्ही देवडियात येऊ नये असे येथील काही लोकांना वाटते. त्यामुळे बैठकांचे निमंत्रण पाठवले जात नाही. याचे भांडवल करून आमच्याच विरोधात तक्रारी केल्या जातात.

पदाधिकाऱ्यांना बैठकांचे रितसर निमंत्रण पाठवावे लागते. प्रदेश काँग्रेसची बैठक असल्याच मेल धाडला जातो. एवढेच नव्हे तर पत्रही पाठविले जाते. त्या बैठकांना सर्व पदाधिकारी उपस्थित असतात. मात्र शहर काँग्रेसच्यावतीने मुद्दामच येऊ नये म्हणून काही लोकांना निमंत्रण दिले जात नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Pithori Amavasya 2026: १० की ११ सप्टेंबर? पिठोरी अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, पूजेची पद्धत अन् महत्त्व!

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

SCROLL FOR NEXT