Sachin Tendulkar: सचिन पोहचला ताडोबाच्या जि.प.शाळेत, विद्यार्थ्यांना वाटली स्कूलबॅग

‘मास्टर ब्लास्टर’ने साधला विद्यार्थ्यांशी संवाद
Sachin Tendulkar
Sachin Tendulkaresakal

चिमूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीला आलेल्या मास्टर ब्लस्टर सचिन तेंडुलकर याने शुक्रवारी (ता. ५) अलीझंजा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली. या भेटीत त्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मागील भेटीत त्याने शाळेत येण्याचे आणि विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करीत सचिनने विद्यार्थ्यांना स्कूलबॅग, पेन आणि पुस्तके भेट दिली. मास्टर ब्लास्टरच्या संवादाने विद्यार्थीही भारावून गेले.

Sachin Tendulkar
श्रीरामपुरच्या राजकारणाचा ठाव लागेना; विखेंसोबत युती अन् थोरातांकडून सत्कार, काय आहे प्रकरण

क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या प्रेमात पडला आहे. आजपर्यंत त्याने ताडोबाला पाचदा भेटी दिल्या. मागील भेटीत ताडोबा सफारीसाठी आलेल्या सचिनला अलिझंजा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.

चौथ्या वर्गातील पाठ्यपुस्तकात कोलाज नावाचा पाठ आहे. हा पाठ सचिनवर आधारित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पाठात असलेल्या पात्राला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी सचिनने शाळेत येण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले होते. गुरुवारी सचिन, पत्नी अंजली आणि आपल्या मित्रांसोबत ताडोबात दाखल झाला.

Sachin Tendulkar
Deepak Kesarkar: कोकणात वाहून जाणारे पाणी नगरला मिळणार? मंत्री दीपक केसरकरांच आश्वासन

‘मास्टर ब्लास्टर’ने साधला विद्यार्थ्यांशी संवाद

कोलारागेट मधील बाँबू रिसोर्टमध्ये सचिनचा मुक्काम आहे. सायंकाळी त्याने जंगल सफारी केली. कोअर क्षेत्रात छोटी तारा वाघिणीचे दर्शन घेतले. शुक्रवारी सकाळी पुन्हा तारा, बिबट अस्वल तथा इतर प्राण्यांचे दर्शन झाले.

या सफारीत शाळेला भेट देतील की नाही, अशी धाकधुक सगळ्यांना लागली होती. मात्र, आपले आश्वासन पूर्ण करण्यासाठी अलीझंजा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देणार असल्याचा निरोप मिळाला.

मास्टरब्लास्टर गावात येत असल्याचा निरोप मिळताच शाळेपुढे रांगोळी घालून स्वागताची तयारी करण्यात आली. सचिन, पत्नी अंजलीसह आल्यानंतर त्यांचे औक्षवण करण्यात आले. त्यांनतर वर्गात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळेस सचिनने विद्यार्थ्यांशी हितगुज करीत मागील भेटीतील आठवण सांगितल्या.

विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग, पुस्तक, पेन भेट आणल्याचे सांगून स्वतःच्या हाताने त्या वितरित केल्या. यावेळी सरपंच गजानन वाकडे, ग्रामपंचायत सदस्य सुनीता नन्नावरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर चौखे, सदस्य गिरीधर वाकडे, वैशाली नागोसे, मुख्याध्यापक रमेश बदके, शिक्षिका मनीषा बावनकर यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com