Sharad Pawar: 'शरद पवारांनी करेक्ट कार्यक्रम...',राजीनाम्याच्या निर्णयावरून शिवसेनेच्या आमदाराचा टोला

शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांनी आता हा निर्णय मागे घेतला आहे
Sharad Pawar Resigns
Sharad Pawar ResignsEsakal

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा २ मे रोजी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात केली होती. त्यानंतर मात्र, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला आहे. शरद पवार यांनी काल (शुक्रवारी) मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत यासंदर्भात घोषणा केली. पवारांनी मागे घेतलेल्या निर्णयानंतर आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना (शिंदे गटा)चे नेते आमदार संजय शिरसाट यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलत होते.

काय म्हणालेत आमदार संजय शिरसाट?

“तुम्ही दोन तारखेचा एपिसोड नीट पहिला तर, जेव्हा शरद पवार यांनी राजीनामा दिला, तेव्हा याबाबतचा कोणताही तणाव सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. त्यावेळी मनात शंका नक्कीच झाली. शरद पवार एवढ्या मोठ्या पदाचा राजीनामा देत आहेत आणि राजकारणातून बाजूला होत आहेत आणि सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्यावर तणाव नाही. याचा अर्थ काही तरी घडत आहे, हे नक्की होतं”, असं संजय शिरसाट म्हणालेत.

Sharad Pawar Resigns
Sharad Pawar: "शरद पवारांसाठी डोके आपटणारे भाजप प्रवेशासाठी उभे होते"

तर “या संपूर्ण राजीनामा नाटकात सर्वात मोठी भूमिका शरद पवारांच्या सहकाऱ्यांनी निभावली आहे. शरद पवारांनी पक्षांतर्गत लोक आणि जे कुणी विरोध करत आहेत, त्यांचा या राजीनामा नाट्यात करेक्ट कार्यक्रम केला. आता पुन्हा अशी हिंमत कराल तर मी माझा बडगा तुम्हाला दाखवीन, असा इशाराच शरद पवार यांनी या राजीनामा नाट्यातून दिला आहे”, असंही पुढे ते म्हणालेत.

“या संपूर्ण घटनेतून शरद पवार यांनी आपल्या ताकदीची परीक्षा घेतली असल्याचंही ते म्हणालेत. तसेच पक्षांतर्गत बंडाळीची जी चिन्हं दिसत होती, त्याला शमवण्यासाठी केलेले हे एक प्रकारचे नाटक जरी असले, तरी तो एक इशारा त्यांनी या माध्यमातून दिला आहे. शरद पवार हे मोठे राजकारणी आहेत. त्यांनी योग्य वेळी टाकलेली ही गुगली होती. शरद पवार हे एवढे साधे नाहीत. त्यांनी यातून अनेकाचा करेक्ट कार्यक्रमही केला आणि ज्यांना इशारा द्यायचा त्यांना इशाराही दिला” असं शिरसाट म्हणाले आहेत.

Sharad Pawar Resigns
King Charles III : ब्रिटनला मिळणार नवा राजा; ७० वर्षानंतर होणार शाही सोहळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com