Lok Sabha Poll 2024
Lok Sabha Poll 2024  Sakal
नागपूर

Lok Sabha Poll 2024 : लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तावरील पोलिसांना जेवण मिळेना?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात उद्या शुक्रवारी (ता.१९) मतदान होणार आहे. सुरळीत निवडणूक पार पाडण्यासाठी उन्हात मतदान केंद्र आणि इतर ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे.

पण, येथे तैनात असलेल्या पोलिसांना दोन वेळचे जेवण देण्यासाठी लागणारा पैसा पोलिस वेअफेअरकडे नसल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरसह रामटेक येथे पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

शहरात शहरात ८३९ इमारतीत २ हजार ७६५ मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने मतदान केंद्र, संवेदनशील परिसर, महिला पोलिंग बूथसह महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

मतदान प्रक्रियेसाठी तीन अपर पोलिस आयुक्त यांच्या देखरेखीत १० पोलिस उपायुक्त, १७ सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, असे एकूण ३२१ पोलिस अधिकारी तसेच ३ हजार २१८ पोलिस अंमलदार व ९४३ महिला पोलिस नेमण्यात आले आहेत.

तसेच साध्या वेशातील सुद्धा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय निमलष्करी दलाचे म्हणजे सीआयएसएफचे दोन कंपन्या, आरपीएफ-१ आणि कर्नाटक राज्य पोलिसांच्या दोन कंपन्यांवर सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शहर पोलिसांच्या मदतीला राज्यातील १३५० आणि छत्तीसगड राज्यातील ५०० होमगार्ड सैनिक नियुक्त करण्यात आले आहेत. असे एकूण ६ हजार ३१९ पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. त्यांच्यासाठी दोन वेळेचे जेवण देण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून पोलिस वेलफेअरला पैशाची मागणी करण्यात आली होती. मात्र, विभागाने पैसे नसल्याचे कारण देत नकार दिला.

विशेष म्हणजे, त्यांना भत्ता मिळत असताना जेवणाचे पैसे कसे काय? मागता असा सवालही करण्यात आला आहे. मात्र, महसूल विभागाद्वारे निवडणुकीच्या कामात असलेल्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जेवण देण्यात येणार आहे.

असे असताना उन्हात आपली सेवा देत, निर्धोकपणे निवडणुका पार पाडण्यासाठी काम करणाऱ्या पोलिस कर्मचारी आणि होमगार्डच्या जेवणासाठी पैसा असू नये ही बाब खरोखरच दुःखद असल्याचे दिसून येते. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिला.

आयुक्तालयाकडून अखेर सोय

शहरातील पोलिसांना दोन दिवसापासून बंदोबस्त असताना, त्यांच्या जेवणासाठी अखेर पोलिस आयुक्तालयाकडून सोय करण्यात आली असल्याची माहिती आहे. खुद्द पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी प्रयत्न केल्याची माहिती असून आता बंदोबस्तातील पोलिस आणि होमगार्डला जेवण मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT