lok sabha first phase polling ramtek shyam barve raju parve kishore gajbhiye politics
lok sabha first phase polling ramtek shyam barve raju parve kishore gajbhiye politics Sakal
नागपूर

Ramtek Lok Sabha Election : रामटेकमधील २८ उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रामटेकच्या धनुष्यबाणाला दिल्लीत पोहचवण्याचे आटोकाट प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत असले तरी महाविकास आघाडीचे श्याम बर्वे यांच्या माध्यमातून सुनील केदार यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. वंचितचा कुकर किती प्रेशर आणतो आणि बसपाचा हत्ती किती धावतो यावर महायुतीचे राजू पारवे यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

रामटेकमधील काँग्रेसचे उमेदवार बर्वे यांची निवडणूक माजी मंत्री सुनील केदार यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे अनेक जण धास्तावले आहेत. मुख्यमंत्र्यांनी उमरडेमधून काँग्रेसचे आमदार पारवे यांच्या हाती धनुष्यबाण दिला आहे. या लढ्यात भाजपची सेना त्यांच्यासोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी रामनवमीनिमित्त मतदारसंघातील विविध मंदिरांना भेटी देऊन जय श्रीरामाचा नारा दिला.

सुमारे दहा दिवस ते रामटेकमध्ये होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कन्हानमध्ये सभा घेतली. यावरून ही निवडणूक हायव्होल्टेज असल्याचे दिसते. केदारांच्या मदतीसाठी कन्हैय्या कुमार यांचा अपवाद वगळा कोणी नेता आला नाही. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये यांनी बंडखोरी केली. त्यांना वंचित बहुजन आघाडीने समर्थन जाहीर केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी दोन सभा त्यांच्यासाठी घेतल्या. बसपाच्या मायावती यांनी नागपूरमध्ये विदर्भातील सर्व उमेदवारांसाठी सभा घेतली. संदीप मेश्राम येथे हत्तीवर आरुढ आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या मतविभाजनावरच विजय अवलंबून राहणार आहे. येथून सर्वाधिक २८ उमेदवार रिंगणात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लॅन बी काय आहे? अमित शाह काय म्हणाले जाणून घ्या...

IPL 2024: हैदराबादनेही प्लेऑफचं तिकीट केलं पक्कं! आता RCB vs CSK सामना लावणार चौथ्या संघाचा निकाल, पाहा कसं आहे समीकरण

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT