सविस्तर वृत्त असे की बुटीबोरी नजीक असलेल्या कोलार या गावी रहिवासी असलेला राजू सिंग भगवान सिंग जुनी वय ४२ वर्ष बुटीबोरी एमआयडीसी मधील शिल्पा कंपनी मध्ये सन २००९ पासून ठेकेदारी करत होता. 
नागपूर

हृदयद्रावक! पोटच्या मुलाचा मृत्यू होताच आईनंही सोडला प्राण; मायलेकाच्या मृत्यूमुळे हळहळले अख्खे गाव  

नितीन कुरई

बुटीबोरी (जि. नागपूर) :- व्यवसायाने ठेकेदार असलेला मुलाचा मृत्यू आईसमोर झाल्याने तो विरह सहन न झाल्याने आईला हृदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना बुटीबोरी जवळील कोलार या गावी घडली. 

सविस्तर वृत्त असे की बुटीबोरी नजीक असलेल्या कोलार या गावी रहिवासी असलेला राजू सिंग भगवान सिंग जुनी वय ४२ वर्ष बुटीबोरी एमआयडीसी मधील शिल्पा कंपनी मध्ये सन २००९ पासून ठेकेदारी करत होता. त्या पूर्वी खेडेगावात पावशी,तवा,चाळणी आणि ड्रम असे सामान विकून आपला उदरनिर्वाह करायचा. वडिलांच्या मृत्यू नंतर कोलार येथे मामाच्या आश्रयाने राहत होता. 

त्यांच्या परिवारात पत्नी सह चार मुले आहे. अचानक तब्येत बिघडल्याने व बीपी, शुगर वाढल्याने नागपूर येथे दवाखान्यात नेत असताना ब्रेन हॅमरेज झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला.मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच  आई माया भाई ऊर्फ राम कौर भगवान जुनी वय 70 वर्ष मुलाचा मृतदेह घरी आल्यावर मुलाच्या विरहात आईने हंबरडा फोडला. राजुचे अंतिम संस्कार रात्री ११ वाजता करण्यात आले.

परिवारात शोक काळा पसरली असता दिनाक ४ तारखेच्या पहाटे ५ वाजता हृदय विकाराच्या झटक्याने आईचे निधन झाले.मुलाच्या विरहात आईने प्रान सोडल्याची घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली. दुपारी बारा वाजता कोल्हार घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : पेट्रोल- डिझेलचे दर पुन्हा वाढणार? इराण-अमेरिका संघर्ष भडकला; होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची इराणची घोषणा

Telangana Crime: तेलंगणात आरोपीकडून सामूहिक हत्याकांड; पत्नी व दोन मुलांसह सहा जणांचा खून; हल्लेखोर राजकुमार फरार

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेतील शोधमोहीम ८३ तासांनी संपली; अखेरच्या बेपत्ता कामगाराचाही मृतदेह सापडला, मृतांचा आकडा ९ वर

Kalamba Pothole Death : कोल्हापुरात खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! नातेवाइकांनी थेट खड्ड्यात मृतदेह ठेवून नोंदवला महापालिकेचा निषेध; सोनार काम करणाऱ्या कुटुंबाचा हरपला आधार

आजचे पंचांग 12 जुलै 2026! प्रदोष, शिवरात्री, राहुकाळ आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

SCROLL FOR NEXT