किडनी घेता किडनी, कुणी आहे का? खासगी रुग्णालयांसमोर अनेकांना करतो विचारणा

It became difficult to live in the Corona period man sale his kidney
It became difficult to live in the Corona period man sale his kidney

नागपूर : त्याचं वय ४३ वर्ष... पदरी दोन मुलं, पत्नी... आईची जबाबदारी. पुणे येथील सी-डॅक या भारत सरकारच्या कंपनीत कामाला. गोड संसार सुरू होता. परंतु, अचानक कामावरून काढून टाकले. जगण्यासाठी उसनवारी सुरू झाली. कर्जाचा डोंगर डोक्यावर चढला. आता जगावं की, मरावं अशा बिकट विवंचनेतून मार्ग काढण्यासाठी त्यांच्या डोक्यात थेट किडनी विकण्याचा विचार आला. जिल्हाधिकारी यांना किडनी विकण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी निवेदन दिले. किडनी घेता किडनी, कुणी आहे का? खरेदीदार असा शोध घेण्यासाठी तो खासगी रुग्णालयांच्या समोर अनेकांना विचारणा करीत उभा असतो.

नाव सुजित देविदास ठमके. मुळचा हिंगणाघाट येथील. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या कार्यालयात ठमके यांनी किडनी विकण्यासाठी रीतसर निवेदनाद्वारे परवानगी मागितली आहे. विशेष असे की, या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले. अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य यांनाही निवेदन दिले. १० वर्षे सी-डॅक या भारत सरकारच्या कार्यालयात कार्यरत असल्याची माहिती पत्रकातून दिली. पत्नी सविता, आई गिरिजाबाई, मुलगा पार्थ आणि मुलगी पाखी असा भरला संसार आहे.

मात्र, अचानक आयुष्याचे चक्र उलट्या दिशेने फिरू लागले. आपल्या मुलांना चांगले जीवन जगता यावे, यासाठी उसनवारी घेणं सुरू झालं. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. देणेकरी अंगावर येऊ लागले. कोरोनाच्या या काळात हाताला काम नाही. आता तुम्हीच सांगा जगायचे कसे? म्हणून आपली किडनी विकायला काढली असल्याच् ठमके म्हणाले. दहा लाखापेक्षा जास्त रक्कम मिळाल्यास कर्ज फेडून उरलेल्या पैशातून लेकरांचे शिक्षण पूर्ण करण्याचे ठमके म्हणाले. 

आईला सांगताच डोळ्यात पाणी आले

जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज देण्यासाठी घरातून निघत असताना सत्तर वर्षीय आईला सुजितने सांगितले. आईच्या पाया पडला. त्यावेळी त्याच्या डोळे पाणावले. आईला त्याने किडनी विकण्यासाठी अर्ज करण्यात जात असल्याचे खरे कारण सांगताच आई धायमोकलून रडली. आईने, पत्नीने समजावले. मात्र अर्ज करण्यासाठी निघालेल्या सुजितची पावले मागे पडली नाही. पत्नीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. लेकरांकडे बघा, असे सांगताच त्याने लेकरांसाठी किडनी विकत असल्याचे सांगत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी घरून निघाला. जिल्हाधिकारी यांना दिले. आता खासगी रुग्णालयासमोर जाऊन कोणाला किडनीची गरज आहे का? अशी विचारणा करीत आहे.

किडनी विकून आलेल्या पैशातून मुलाचं शिक्षण होईल
मी परिस्थितीसमोर हरलो आहे. जातीय मानसिकतेतून माझ्यावर अन्याय झाला. मला नोकरीतून काढलं. परिस्थिती बिकट आहे, परंतु मला मरायचंही नाही. किडनीसारखा एखादा अवयव विकून थोडाफार आर्थिक हातभार लागला तर कर्ज फेडून लेकरांना शिकवण्यासाठी मदत होईल. माझं आयुष्य कमी झालं तरी चाललं, पण किडनी विकून आलेल्या पैशातून मुलाचं शिक्षण होईल. त्यांचं आयुष्य सुधारेल.
- सुजित देविदास ठमके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com