Nagpur  Sakal
नागपूर

Nagpur : राज्यातील ६० कारागृहांमध्ये निनादणार "गजर कीर्तनाचा"

कैद्यांच्या विचारसरणीत वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेतून सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कारागृहांमध्ये कीर्तनाचा गजर करण्यात येणार असल्याचे निलेश महाराज म्हणाले.

सकाळ वृत्तसेवा

मेहकर - अनेकविध गुन्ह्यांच्या प्रकरणी राज्यातील कारागृहांमध्ये हजारो कैदी शिक्षा भोगत आहेत.त्यांच्यात वैचारिक, मानसिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी वारकरी विचारसंहिता परिषदेकडून राज्य शासनाला कारागृहांमध्ये कीर्तनांचे कार्यक्रम करण्याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला होता.त्याबाबत शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कारागृहांमध्ये कीर्तनाचा गजर निनादणार आहे .

या प्रक्रियेची सुरुवात म्हणून नागपूर येथील कारागृहात सोमवारी ता.१७ रोजी पहिला कीर्तनाचा शुभारंभाचा प्रयोग होणार असल्याची माहिती, वारकरी विचारसंहिता परिषदेचे प्रवर्तक निलेश महाराज झरेगाववकर यांनी येथे दिली.

क्रमाक्रमाने राज्यातील सर्व ६० कारागृहांमध्ये कीर्तनाचा गजर होणार आहे.देशातील सहाव्या क्रमांकाचे नृसिंह पीठ मेहकर येथे ज्ञानमंदिरात आहे.आज निलेश महाराज यांनी गुरुपीठाला भेट देऊन आशीर्वाद घेतले .त्यावेळी त्यांनी वरील महत्वाच्या उपक्रमाची माहिती दिली.

ऍड.रंगनाथ महाराज पितळे यांनी त्यांना गुरुपीठाकडून आशीर्वाद दिले.नृसिंह संस्थानचे विश्वस्त आशिष उमाळकर यांनी सत्कार केला. कैद्यांच्या विचारसरणीत वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेतून सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कारागृहांमध्ये कीर्तनाचा गजर करण्यात येणार असल्याचे निलेश महाराज म्हणाले.

राज्यात ९ मध्यवर्ती तर ३१ जिल्हा कारागृहे असून १९ खुले आणि एक महिला कारागृह असे ६० कारागृह आहेत.त्यांची क्षमता २५ हजार असतांना प्रत्यक्षात ४१ हजार कैदी आहेत.

त्यांच्यात वैचारिक ,मानसिक परिवर्तन घडविण्यासाठी प्रत्येक कारागृहात प्रबोधनात्मक कीर्तने करण्याचा प्रस्ताव परिषदेकडून राज्य शासनाला देण्यात आला होता.त्याला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून पहिला कीर्तनाचा गजर नागपूर कारागृहात सोमवारी होणार आहे,अशी माहिती निलेश महाराज यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: गर्भवती असतानाही Mains दिली; 26 दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊन मुलाखत दिली अन् थेट DSP झाली!

IND vs JPN: भारत-जपानचा T20 सामना कुठे पाहता येणार? मीडिया राइट्समध्ये मोठा पेच; नेमकं काय झालं?

Marathi News Live Updates: पुण्यात प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटीलसह मंडळाच्या अध्यक्ष, आयोजकावर गुन्हा

जरागेंच्या उपोषणाचा १० वा दिवस, प्रकृती खालावल्यानं मराठा बांधवांचा सरकारला इशारा | Jarange Patil

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

SCROLL FOR NEXT