Mumbai : भंडार्ली डम्पिंग 14 गावातील ग्रामस्थ बंद पाडणार; शिंदे सरकारला पुन्हा असहकार्याची भूमिका

यामुळे या भंडार्ली येथील कचऱ्या विरोधात पुन्हा एकदा ग्रामस्थ एकवटले आहेत.
Mumbai
Mumbaisakal

Mumbai - दिवेकरांचे डम्पिंग पासून पूर्णतः मुक्तता करण्यासाठी एकीकडे ठाणे महानगरपालिका आराखडा तयार करत असताना दुसरीकडे हाच कचरा

भंडार्लीवासीयांच्या माथी मारला जात आहे. भंडार्ली डम्पिंगची मुदत संपल्यानंतर ही येथे ठाणे महानगरपालिका कचरा टाकत असून या कचऱ्याची दुर्गंधी, त्यातून वाहणारे सांडपाणी यामुळे आजूबाजूच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Mumbai
Mumbai News : पाकिस्तानी सीमाला परत द्या, अन्यथा मुंबईत घातपात; पोलिसांना अज्ञाताकडून धमकीचा कॉल

यामुळे या भंडार्ली येथील कचऱ्या विरोधात पुन्हा एकदा ग्रामस्थ एकवटले आहेत. शुक्रवारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी ग्रामस्थांसह भंडार्ली डम्पिंगची पहाणी केली. यावेळी डम्पिंग शनिवारपासून बंद करण्याचा निर्णय घेत शिंदे सरकारला असहकार्य करण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिवा येथील डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिवेकरांना दिले होते. ती वचनपूर्ती करण्यासाठी फेब्रुवारी 2022 मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातील 14 गावातील भंडार्ली येथील जागा भाडेतत्वावर ठाणे महानगरपालिकेने घेतली. या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा विल्हेवाट प्रकल्प राबविण्याचा ठराव केला गेला.

Mumbai
Mumbai News : उपकर प्राप्त इमारतींतील अतिक्रमणांबाबत आता पालिका आणि म्हाडाची संयुक्त पथके

ठाणे महापालिकेचा कचरा ग्रामस्थांच्या माथी का ? असे म्हणत या प्रकल्पाला भंडार्ली ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला होता. ग्रामस्थांच्या या भूमिकेला कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील, माजी आमदार सुभाष भोईर यांनी पाठिंबा दिला होता. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामस्थांची भेट घेत येथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार असून कोणत्याही प्रकारचे प्रदुषण यामुळे होणार नाही. तात्पुरत्या स्वरुपातील या प्रकल्पास सहकार्य करावे असे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे.

त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली.

केवळ वर्षभरासाठी हा प्रकल्प येथे राबविण्यात येणार होता. फेब्रुवारी महिन्यात याची मुदत संपली असतानाही आज ही याठिकाणी ठाणे महानगरपालिका कचरा गाड्या रिकाम्या करत आहे. कचऱ्याचा डोंगरच इथे उभा राहिला असून त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे.

पावसाचे पाणी कचऱ्यात मिसळून सांडपाण्याचे लोटच्या लोट वहात असून ते नागरिकांच्या घरात, शेतात गेल्याने नुकसान झाले आहे. वायू, जल प्रदूषण सोबतच कचऱ्यावर घोंगावणाऱ्या माशांचे प्रमाण एवढे वाढले आहे की दिवसरात्र नागरिकांना घराच्या दारे खिडक्या बंद करून बसावे लागत आहे.

शेती, मासेमारी याचे होणारे नुकसान आणि उदभवणारी आरोग्याची समस्या पाहता ग्रामस्थांनी हे डम्पिंग बंद पाडण्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून शनिवार पासून घंटागाड्या वरती जाऊ देणार नसल्याचे ग्रामस्थ बोलत आहेत. तसेच ठाणे जिल्ह्यात शिंदे सरकारला असहकार्य करण्याचा निर्णय ग्रामस्थ, स्थानिक आमदारांनी घेतला असून आता ठाणे जिल्ह्यातच होणारा विरोध शिंदे सरकार आता कसे क्षमवते हे पहावे लागेल.

Mumbai
Mumbai News : उपकर प्राप्त इमारतींतील अतिक्रमणांबाबत आता पालिका आणि म्हाडाची संयुक्त पथके

शहरातील कचरा ग्रामीण भागात टाकण्यासाठी आम्ही वर्षभरापूर्वी विरोध केला होता. तेव्हा तत्कालीन पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विनंती केली होती की येथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प उभारणार आहोत, वर्षभरात तो आम्ही बंद करू. मात्र आता वर्ष उलटून गेले हे डम्पिंग बंद झालेले नाही.

तसेच येथे कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात असल्याचे देखील चित्र दिसत नाही. आता वर्ष उलटून गेल्यानंतर ना आम्हाला सोयीसुविधा दिल्या. ना तिथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. ओला सुका कचरा एकत्रित येथे टाकला जात असून तो फक्त मिक्सर मधून काढला जात आहे.

Mumbai
Mumbai Local: चाकरमान्यांचे हाल! लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने

त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे सर्व असताना आम्ही सहकार्याची भूमिका ठेवली होती. परंतु आम्हाला आतापर्यंत ठेंगा दाखवाला गेला. त्यामुळे आता आम्ही सर्व गावकरी मिळून हा निर्णय घेतला आहे की हा डम्पिंग बंद करायचा आणि आम्ही यांना कोणतेही सहकार्य करणार नाही. यापुढे येथे कचरा टाकायचा प्रयत्न केला तर येथील कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण होईल त्याची जबाबदारी ही सरकारची राहील असे सांगितले.

राजू पाटील, कल्याण ग्रामीण आमदार

या डम्पिंगमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच मासेमारीवर देखील परिणाम झाला आहे. त्यावरच आमची रोजी रोटी असते. बोअरवेल, विहिरींचे पाणी खराब झाले आहे. डम्पिंग येण्याविषयी जेव्हा बैठक झाली होती त्यावेळी काही अटी शर्ती घातल्या गेल्या होत्या. हा डम्पिंग नसून एक प्रकल्प आहे असे सांगितले गेले होते. पण आज परिस्थिती पाहता आम्ही नरक यातना येथे भोगत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आता आमची या नरकातून सुटका करावी.

कैलास पाटील, माजी सरपंच भंडार्ली

चूक झाली मी असं म्हणेल कि आमची चूक झाली. ठाण्यात बैठक झाली तेव्हा आमदार देखील होते. तेव्हा आम्ही डम्पिंगला होकार दिला तीच आमची चूक झाली. कारण आम्ही सुद्धा आता 30 ते 32 वर्ष या नेत्यांजवळ काम करतोय तीच आमची चूक झाली.

रमेश पाटील, माजी ठाणे जिल्हा परिषद सदस्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com