school bus sakal
नागपूर

नागपूर : पाल्यांची शाळेतील ने-आण ठरतेय डोकेदुखी

स्कूल व्हॅन, बसेसवर बंदी; शाळांकडूनही जबाबदारी घेण्यास नकार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यात पाचवी ते १२ वी पर्यंतच्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू झाल्या. मात्र, मुलांना शाळेत नेण्यासाठी आवश्‍यक स्कूल बस आणि व्हॅनला अद्याप सरकारकडून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पाल्यांना शाळेत ने-आण करण्याची जबाबदारी पालकांवर आली आहे. याचा फटका काम करणाऱ्या जोडप्यांना बसत असून, त्यांना ऑफिसमधून पाल्यांना घेण्यासाठी शाळेत जावे लागत आहे.

दीड वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे स्कूल व्हॅन आणि बसेसही बंद झाल्या. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात शाळा सुरू झाल्या. मात्र, कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने काही दिवसांत शाळा बंद करण्यात आल्या. कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याने राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हे करीत असताना सरकारने स्कूल बस आणि स्कूल व्हॅनमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याची मुभा दिलेली नाही. त्यामुळे पालकांना स्वतःच विद्यार्थ्यांना शाळेत सोडून देणे आणि परत आणण्याचे काम करावे लागते. विविध शाळांद्वारे विद्यार्थ्यांना विविध वेळेत शाळांमध्ये बोलाविण्यात येते.

त्यामध्ये सकाळी ८ ते १२ आणि १२ ते ४ असा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी वडिलांना पाल्यांना सोडून देणे आणि आईला त्याला आणायला जावे लागते. मात्र, घरात आई आणि वडील हे दोघेही नोकरीवर असलेल्या पालकांना पाल्याचा ने-आण करण्यात त्यांची बरीच दमछाक होते. त्यामुळे अनेकदा कार्यालयात पोहोचण्यास उशीर होतो. त्यातून नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पूर्वी स्कूल बस आणि स्कूल व्हॅन असल्याने पालकांवर पाल्याला शाळेत सोडण्याचे टेन्शन नव्हते. मात्र, सध्या त्याची सोय नसल्याने पालकांचे टेन्शन वाढले आहे.

शाळांकडून नियमांचा दाखला

पाल्याला शाळेत सोडल्यावर घरातील ओळखीचा व्यक्ती किंवा खुद्द पालक ज्यांची नावे व फोटो शाळेत आहेत अशांकडेच विद्यार्थ्यांना सुपूर्द करण्याचा नियम आहे. त्यामुळे त्यासाठी केवळ पालक वा घरच्याच व्यक्तीला जावे लागते. याशिवाय नियमांमुळे स्कूलव्हॅन आणि बसेसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास मनाई असल्याने त्यालाही शाळांकडून परवानगी नाही.

शहराबाहेरील शाळांमुळे वाढली चिंता

नामवंत बहुतांश सीबीएसई शाळा या शहराबाहेर आहेत. मात्र, यामध्ये शिकणारे बहुतांश विद्यार्थी शहरातील आहेत. सध्या पाचवी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू झाले असल्याने या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी इतक्या लांब नेताना पालकांची दमछाक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, चार जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT