government schemes benefits
government schemes benefits 
नागपूर

नागपूर : शासकीय योजनांच्या लाभापासून तृतीयपंथी वंचित

केवल जीवनतारे

नागपूर : दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या तृतीयपंथी कल्याण मंडळाला राज्याने पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. या निधीचे काय झाले, हे न सांगता यंदाच्या अर्थसंकल्पात बीज भांडवल योजनेची घोषणा करण्यात आली. मात्र या दोन्ही योजनांचा लाभ तृतीयपंथी वर्गापर्यंत पोहोचलेला नसल्याची माहिती पुढे आली आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यकाळात तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पुढे हा विषय थंडबस्त्यात गेला. यानंतर २०१५ मध्ये राज्यात तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मंडळासाठी पुढाकार घेतला. २०१९ मध्ये शासन निर्णय काढण्यात आला. तर याची अंमलबजावणी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने सत्तेत आल्यावर जून २०२० मध्ये केली. तृतीयपंथी संरक्षण आणि कल्याण मंडळाची स्थापना झाली. तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली. मात्र या दोन वर्षांच्या काळात एकाही तृतीयपंथीयाला स्वयंरोजगारासाठी बीजभांडवलासह कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नाही.

केवळ एक बैठक ऑनलाइन

तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या सदस्यांची सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत एकच ‘ऑनलाइन’ बैठक झाली. तृतीयपंथीयांचे सर्वेक्षण करून त्यांची संख्या निश्चित करण्यासोबतच कोणत्या योजनांमध्ये समावेश करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट तयार करण्यात येईल, असे सांगण्यात आले. तसेच बीज भांडवल योजनेला गती देण्याबाबतचे निर्देश सचिव आणि आयुक्तांना दिले होते. परंतु, हे निर्देश अखेरपर्यंत थंडबस्त्यात राहिले.

१५०० रुपयांच्या मदतीपासूनही वंचित

लॉकडाउनच्या काळात तृतीयपंथीयांनाही मदतीची मागणी केल्यावर प्रत्येक तृतीयपंथीयाला १५०० रुपये मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र नागपुरातील एकाही तृतीयपंथीयाला ही मदत मिळाली नसल्याची खंत राणी ढवळे यांनी व्यक्त केली.

सरकारकडे तृतीयपंथीयांची आकडेवारीच नाही. यामुळेच तृतीयपंथीच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी कितीही प्रयत्न केले तरी नेमकी मदत कशी द्यावी याचे नियोजन करण्यात येत नाही. संकटाच्या काळात या योजनेचा फायदा मिळाला नाही.

-राणी ढवळे, अध्यक्ष, किन्नर विकास बहुद्देशीय सामाजिक संघटना, नागपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT