pregnancy  sakal
नागपूर

Nagpur : गर्भवतीवर चुकीचा उपचार; दोन डॉक्‍टरांवर गुन्हे दाखल

सदर महिला गर्भवती असताना त्यांचा चुकीचा उपचार केल्यामुळे त्या महिलेला ७ ते ८ लाख रुपये खर्च सोसावा लागला असून, भविष्यात सुद्धा खर्च लागणार असल्याचे सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

शेगाव - गर्भवती महिलेवर चुकीचा उपचार केल्याप्रकरणी शेगाव पोलिस स्‍टेशनमध्ये डॉ. प्रवीण नागरगोजे व खामगाव येथील डॉ.गणेश महाले यांच्या विरुद्ध शेगाव पोलिसांनी २३ मे रोजी विविध कलमान्वये न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल केला.

प्रवीण नागरगोजे (वय ४२) रा. खामगाव रोड जगदंबा चौक शेगाव यांच्याकडे उपचार घेतला व त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार खामगाव येथील डॉ. गणेश महाले यांच्याकडे केला. असे असताना २९ जुलै २०२२ रोजी शीतल ढोले यांनी डॉ. प्रवीण नागरगोजे यांचेकडे एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर त्या मुलीचा अकोला व मुंबई येथील बालरोगतज्ञांकडे उपचार केला असता तेथील डॉक्टरांनी तिची हार्टसर्जरी व गर्भवतीवर इतर उपचार घेण्याचा सल्ला दिला.

त्यावरुन डॉ. प्रवीण नागरगोजे व डॉ. गणेश महाले यांनी सदर महिला गर्भवती असताना त्यांचा चुकीचा उपचार केल्यामुळे त्या महिलेला ७ ते ८ लाख रुपये खर्च सोसावा लागला असून, भविष्यात सुद्धा खर्च लागणार असल्याचे सांगितले.

याबाबत शीतल ढोले यांनी यांनी साक्षीदार डॉ. अतुल राजपूत यांच्याकडे उपचार केला असता डॉ. नागरगोजे व गणेश महाले या दोघांनी त्या महिलेच्या उपचाराची गंभीरतेने दखल घेतली नसल्याचे स्पष्ट झाल्याने ॲड. नीलेश ढोले यांच्याद्वारे विद्यमान न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीहून २३ मे रोजी न्यायालयाच्या आदेशाने उपरोक्त दोन्‍ही डॉक्टरांविरुद्ध शेगाव पोलिस स्‍टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Pollution Crisis : नागपूरचा श्वास गुदमरतोय, संत्रानगरी धोक्याच्या उंबरठ्यावर; प्रदूषणाचा विळखा

Auqib Nabi: जम्मू-काश्मिरच्या गोलंदाजाने इतिहास रचला, रणजी स्पर्धेत अविश्वसनीय कामगिरी; गौतम गंभीर लक्ष आहे ना तुझं?

तोळ्यात नाही तर किलोत ! विजय-रश्मिकाच्या लग्नासाठी बनवले गेले एवढ्या वजनाचे सोन्याचे दागिने

Latest Marathi News Live Update : नांदेडमधील महापलिकेच्या सफाई कामगारांचे आज काम बंद आंदोलन

Walmik Karad: मनोज जरांगेंचं भाकीत खरं ठरणार? वाल्मिकचा मुलगा धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलणार? फेसबुक पोस्टचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT