Mumbai : कल्याण शहरात रस्त्याच्या मधोमध वाहन पार्कींग; वाहतूक कोंडीवर पोलिस काय करत आहेत?

वाहतूक पोलिस काय करत आहेत
mumbai parking issue vehicle park in middle of road traffi police road construction
mumbai parking issue vehicle park in middle of road traffi police road construction sakal

डोंबिवली - कल्याण, डोंबिवली शहरात रस्त्यांची सीमेंट कॉंक्रीटीकरणाची कामे सुरु आहेत. या कामांमुळे आधीच मुख्य रस्त्यांवर वाहनांची कोंडी होत असतानाच काही वाहनचालकांनी तर हद्दच पार केल्याचे दिसून येते. रस्त्यांची सुरु असलेल्या कामांचा फायदा घेत वाहन चालक रस्त्याच्या मधोमध आपली वाहने पार्क करत असल्याचे दिसून येत आहे.

कल्याणमध्ये डी मार्ट समोरील रस्त्यावर मधोमध वाहन पार्क केली आहेत, तर डोंबिवलीतील मानपाडा रोडवर वाहनचालकांनी रस्त्यावर आपली वाहने पार्क केली आहेत. या वाहनांमुळे इतर वाहनांना मार्गक्रमण करताना अडथळा निर्माण होत असून वाहतूक पोलिस काय करत आहेत असा सवाल उपस्थित केला जात आहे.

mumbai parking issue vehicle park in middle of road traffi police road construction
Mumbai : डोंबिवली एमआयडीसीतील रस्ता लालेलाल; रस्त्यावर केमिकल मिश्रीत सांडपाणी

कल्याण डोंबिवली शहरात एमएमआरडीए, एमएसआरडीसी यांच्यावतीने मुख्य रस्त्यांची सीमेंट कॉंक्रीटीकरणची कामे सुरु आहेत. कल्याण शीळ रोड, मानपाडा रोड या रस्त्याचे सीमेंट कॉंक्रीटीकरणचे काम टप्प्या टप्प्याने करण्यात येत आहे. कल्याण शीळ रोड हा वाहतूकीच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता असून सध्या कल्याण शीळ रस्त्याला लागून असलेल्या आग्रा रोड चे रस्त्याचे कॉंक्रीटीकरणचे काम सुरू आहे.

mumbai parking issue vehicle park in middle of road traffi police road construction
Mumbai Police : ट्विटरद्वारे मुंबईत घातपाताची मुंबई पोलिसाना धमकी.. नांदेडमधून एकाला अटक...

डी मार्ट समोरील रस्त्याच्या मध्य भागाचे कॉंक्रीटीकरणचे काम करण्यात आले आहे. कॉंक्रीटीकरण सुकण्यासाठी सोडले जात असताना याचा फायदा वाहन चालक घेत आहेत. आपली वाहने पार्क करण्यासाठी वाहन मालक अशा रस्त्यांचा वापर करत आहेत. आग्रा रोडवर अरुंद रस्त्यावरुन सध्या वाहतूक सुरु आहेत. केडीएमटी, एनएमएमटी बसचालकांना याच रस्त्यावर थांबा दिलेला असल्याने अनेक बसेस या रस्त्यावर मार्गक्रमण करतात.

डि मार्ट, महाविद्यालय, पेट्रोल पंपवर येणाऱ्या वाहनांची या रस्त्यावर वर्दळ असते. यामुळे या ठिकाणी सातत्याने वाहन कोंडीचा सामना करावा लागतो. रस्त्याच्या ज्या भागाचे काम पूर्ण झाले आहे, तेथे बिनधास्त वाहन चालक आपली वाहने पार्क करत आहेत. काम पूर्ण झालेला रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येत नाही, मग वाहन पार्कींग साठी कोणाच्या आर्शिवादाने दिला जातो. कोणाची वाहने येथे पार्क केली जातात ? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

mumbai parking issue vehicle park in middle of road traffi police road construction
Mumbai : डोंबिवली एमआयडीसीतील रस्ता लालेलाल; रस्त्यावर केमिकल मिश्रीत सांडपाणी

डोंबिवलीतील मानपाडा रस्त्याचे देखील काँक्रीटीकरणाचे काम करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी हा रस्ता अरुंद असल्याने तसेच रस्त्याच्या एका बाजूचे काम सुरु असताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यातच रस्त्याचे काम झालेल्या ठिकाणी वाहन चालक बिनधास्त आपली वाहने पार्क करुन निघून जातात.

वाहन पार्किंगसाठी हे रस्ते आंदण दिले आहेत का ? रस्त्यांची कामे सुरु असली तरी वाहन कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ज्या भागाचे काम पूर्ण झाले आहे, तो त्वरीत वाहतूकीसाठी खुला करणे, योग्य पद्धतीने वाहतुकीचे नियोजन करणे हे वाहतूक पोलिसांचे काम असताना ते होताना दिसत नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे.

mumbai parking issue vehicle park in middle of road traffi police road construction
Mumbai Local News : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनी थांबवली एसी लोकल, कारण...

कल्याण शीळ रोडला लागून असलेल्या आग्रा रोडचे कॉंक्रीटीकरणचे काम सुरु आहे. त्यातच कल्याणमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत देखील कामे सुरु आहेत. यामुळे वाहन कोंडीची समस्या निर्माण होत असताना वाहतूक पोलिस मात्र काहीच नियोजन करताना दिसत नाही. डि मार्ट जवळील कॉर्नरला बसला थांबा देण्यात आला आहे. या ठिकाणी बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची गर्दी होते. त्यात रस्त्याचे काम सुरु असल्याने वाहने देखील कोंडीतून मार्ग काढत असतात. त्याच ठिकाणी रस्त्याच्या मधोमध वाहने पार्कींग केली जातात. हे कोणाच्या आर्शिवादाने सुरु असते. वाहतूक पोलिस नेमके काय करतात हा प्रश्न आहे.

- ललित चौधरी, सर्वसामान्य नागरिक

रस्त्यांची कामे संथ गतीने सुरु असून त्यामुळे वाहनचालकांना खराब रस्ते आणि कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच अनेक वाहन चालक या कामांचा फायदा घेत रस्त्यालगत मिळालेल्या मोकळ्या जागेत आपली वाहने पार्क करतात. या वाहनांमुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होतो, परंतू त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. वाहतूक पोलिस अशा वाहनांवर कारवाई का करत नाही ?

- दिनेश नलावडे, सर्वसामान्य नागरि

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com