Number of dead birds found in Kondhali Nagpur district  
नागपूर

राज्यातही बर्डफ्लू? नागपूर जिल्ह्यातील कोंढाळीत मोठ्या संख्येत आढळले मृत पक्षी; नमुने तपासणार

संजय आगरकर

कोंढाळी (जि. नागपूर) :  कोंढाळी या भागातील रिगणाबोंडी, मिनीवाडा, मसाळा, चाकगेडोह आदी भागात गेल्या काही दिवसांपासुन पोपट, चिमण्या, कावळे, जंगली कबुतर अशा पक्ष्यांचा मोठया संख्येत अज्ञात रोगाने मृत्यु होत आहे. रिगणाबोडी येथे तर झाडाखाली मृत पोपटांचा सडा पडला आहे. 

रिगणाबोडी येथील पोलिस पाटील संजय नागपुरे  यांनी रिगणाबोडी भागात  मोठ्या संखेत पोपटांचा मृत्यु झाल्याची माहिती कोंढाळीचे  ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांनी काटोलचे तहसीलदार अजय चरडे  यांना माहिती दिली. काटोलचे तालुका पशुधन अधिकारी व कोंढाळीचे प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ.तुषार पुंड व सुधिर कापशीकर रिगणाबोंडी भागात गेले.  झाडांखाली जाऊन निरिक्षण केले. 

तिथे मृत पक्ष्यांचा खच पडला होता. डॉ.तुषार पुंड यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.मजुषा पुंडलिक व प्रभारी  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.युवराज केने यांना माहिती दिली  जिल्हास्तरीय प्रयोग शाळेतील चमु नागपुर येथुन  रिगणाबोडी कडे रवाना झाली.पशुसंवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडलिक व प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.युवराज केने  नागपूर जिल्हा सर्व पशु चिकित्सालय चे प्रमुख डॉ.उन्मेश हिरूडकर,काटोल येथील तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय डॉ.निरंजन शेटे   मृत पक्ष्यांचे नमुने गोळा केले.

या पक्ष्यांचा मृत्यु कशामुळे झाला हे स्पष्ट करण्याकरीता हे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय वायरस प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे कारण राज्यात बर्ड फ्लु वायरस शोधणारी प्रयोगशाळा नसल्याने हे सर्व मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथे पाठवावे लागणार आहेत अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त मंजुषा पुढलिक यांनी दिली. त्यामुळे आता अहवाल आल्यानंतरच पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला की नाही हे स्पष्ट होईल. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IDBI Bank चा मालक बदलणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर काय परिणाम होणार?

SHREYAS IYER: वेस्ट इंडिजकडून पराभव होताच श्रेयस अय्यर नाराज; सामन्यानंतर सांगितलं नेमकं कुठे चुकलं, गोलंदाजांवरही केलं भाष्य

'आजीची नऊवारी अन्..' असं झालं माधुरी आणि श्रीराम नेनेंचं लग्न, अभिनेत्री म्हणाली...“रामला भावाच्या घरी आम्ही…”

Latest Marathi News Update : खासदार सुनिल तटकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला...

Mumbai News: काळू धरणावरील स्थगिती उठवली, नव्याने निविदा काढण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT