अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घराचं शेजाऱ्यांनी उघडलं दार; पलंगाजवळील दृश्य बघून भल्याभल्यांचा उडाला थरकाप 

सतीश डहाट
Wednesday, 6 January 2021

शेजारी नागरिकांनी लगेच जुनी कामठी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली असता ठाणेदार विजय मालचे सहकार्‍यांसोबत घटनास्थळी जाऊन दार उघडले असता पलंगावर

कामठी (जि. नागपूर) : जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाल ओळी नंबर २ येथील एका बंद घरात कामठी नगर परिषदेचे कर्मचारी घर कराची डिमांड पावती देण्याकरिता घरी गेला असता  घर बंद असल्याने शेजार्‍याला विचारपूस केली असता शेजार्‍यांनी दाराच्या आतून  पावती खाली टाकण्यास सांगितले कर्मचारी  पावती घरात टाकण्यात गेला असता त्याला घरातून दुर्गंधी आली. पोलिस येताच जे दृश्य दिसलं ते बघून उपस्थितांना धक्काच बसला. 

शेजारी नागरिकांनी लगेच जुनी कामठी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली असता ठाणेदार विजय मालचे सहकार्‍यांसोबत घटनास्थळी जाऊन दार उघडले असता पलंगावर कल्पना नागोराव लोटे (५०), पलंगाच्या खाली जमिनीवर पद्मा नागोराव लोटे (६०) या दोघींचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत दिसून आले दोन्ही कुजलेल्या प्रेताचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शव विच्छेदन अहवाल आल्यानंतर उघड होणार असले तरी भुकेने व्याकूळ झाल्याने यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.      

जाणून घ्या - 'त्या' चौघांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी फोडला टाहो; हिवरा-हिवरी गावात पसरली शोककळा; सरपंचांनाही अनावर झाले अश्रू
              
दोघीही होत्या उच्चशिक्षित 

शेजाऱ्याकडून माहिती घेतली असता पदमा व कल्पना ह्या दोघी सख्या बहिणी असून दोन्ही उच्च शिक्षित होत्या, दहा वर्षापूर्वी त्यांचे आई-वडील मरण पावले त्यानंतर दोन्ही बहिणीनी धुणीभांडी व मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते परिस्थिती हलाखीची असताना त्यांनी शेजारी व इतर कोणत्याही नातेवाइकांकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता आपल्या घरीच राहत होते. 
 
शेजाऱ्यांशी नव्हता संपर्क 

आई वडील मरण पावले तेव्हा पासून दोन्ही बहिणी घराचे दार बंद करून घरात राहत होते शेजारी व इतर कोणाशी त्यांचा  कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता म्हणून शेजाऱ्यानी त्या दोनही बहिणी घरातच असतील असे वाटत होते. 

अधिक माहितीसाठी - गाढ झोपेत असताना आला मोठा आवाज, घराबाहेर धाव घेताच दिसलं थरारक दृश्य

कारण गुलदस्त्यात 

यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शव विच्छेदन अहवाल आल्यानंतर उघड होणार असले तरी भुकेने व्याकूळ झाल्याने यांचा मृत्यू झाला की आजारपणामुळे मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शवर्विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावरच मृत्यूचे कारण कळणार असल्याचे ठाणेदार विजय मालचे यांनी सांगितले. जुनी कामठी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस जी पाटील करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police found mortals of 2 sisters in Kamptee Nagpur district Latest News