One hundred to one hundred and fifty rupees per kg of mango 
नागपूर

आंबा बाजारात, पण महाग; शंभर ते सव्वाशे रुपये किलो!

राजेश रामपूरकर

नागपूर : उन्हाळा आणि आंब्याचा रस हे समीकरण आहे. पिकलेले आंबे बाजारात येताच त्याच्या घमघमाटाने जिभेला पाणी सुटले नाही तर नवलच. मात्र, सध्या आंब्याच्या रसावर ताव मारणाऱ्यांना यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. विदर्भात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात आंब्याचे नुकसान झाले आहे. शेजारच्या राज्यातून येणाऱ्या आंब्यांची आवकही कमी असून आंब्याची सुरूवातच असल्याने भाव वाढलेले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळेही आवकही काही प्रमाणात कमी झाल्याने भाव चढेच आहेत.

वाढते शहरीकरण, तर खेडी ओस पडत चालली आहेत. त्यामुळे खेडय़ात आजोळी जाण्यापूर्वी असणारी मजा आता कालबाह्या झालेली आहे. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांना घरातच बसण्याची पाळी आली होती. यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सरकार टाळेबंदी लावणार का याबद्दल चर्चा सुरू असताना आंब्याची आवकही कमी झालेली आहे. त्यामुळे भाव वाढलेले आहेत.

विदर्भात अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ बुलढाणा, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या भागात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणात आंब्याचा मोहर गळला, काही ठिकाणी तर झाडाला लागलेल्या कैऱ्याही पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.

ज्या भागात तो शिल्लक आहे त्याची प्रत खराब झाली आहे. त्यामुळे यावेळी बाजारात कच्च्या आंब्याची आवक कमी होण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेशातून येणाऱ्या बैगनफल्ली आब्यांची आवक सुरू झालेली आहे. आवक आणि मागणी यात तफावत असल्याने भाव वाढलेले आहेत. घाऊक बाजारात बैगनफल्ली आंबा ६० ते ७० रुपये किलो आहे. किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपये प्रति किलो प्रमाणे विकल्या जात आहे.

नैसर्गिक संकटांचा आंब्याला फटका

सध्या द्राक्षाचा हंगाम जोरात आहे. हा ओसरायला लागल्यावर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आंबे बाजारात यायला सुरुवात होते. सरासरी प्रति किलो ४० रुपये प्रमाणे कच्च्या आंब्यांचे सध्या दर आहेत. आंध्रप्रदेशातूनत येणारे बैगनफल्ली, तोताफल्ली आणि निलम आंब्यांची आवकही गेल्या काही वर्षांपासून कमी होत आहे. नैसर्गिक संकटांचा आंब्याला फटका बसला आहे. रसाचे आंबेही महागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT