esakal | कुख्यात गुंड रणजित सफेलकरवर माजी मंत्र्यांचा वरदहस्त, पाच-पन्नास रुपायांची सवारी मारणारा ऑटोचालक झाला कोट्यधीश
sakal

बोलून बातमी शोधा

political support to goon ranjeet safelkar nagpur crime news

रणजितने आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या हत्याकांडाची सुपारी पाच कोटीत घेतली. कुठेही समोर न येता कालू हाटेकडून हत्याकांड घडविले. तसेच कुख्यात मनीष श्रीवास याची टोळी मोठी होत असल्यामुळे स्वतःच्या जिवाच्या भीतीने मनीषचा खून केला.

कुख्यात गुंड रणजित सफेलकरवर माजी मंत्र्यांचा वरदहस्त, पाच-पन्नास रुपायांची सवारी मारणारा ऑटोचालक झाला कोट्यधीश

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : एकेकाळी सेकंडहँड ऑटो चालवून पोट भरणाऱ्या रणजित सफेलकरकडे पोलिसांना आलिशान गाड्यांचा ताफा आढळला. त्याच्या गुंडगिरीला राजकीय वरदहस्त लाभल्याने चक्क पाच-पाच कोटींची हत्याकांडाची सुपारी घ्यायला लागला. संरक्षणासाठी श्रीराम सेनेचा वापर करून 'हाजी मस्तान' होऊ पाहणाऱ्या सफेलकरचे सर्व मनसुबे मात्र, अपयशी ठरले. 

हेही वाचा - परिस्थिती गंभीर! शववाहिकाही पडताहेत कमी, आता आपली बसमधूनही मृतदेहांची वाहतूक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजित सफेलकर हा बेरोजगार युवक होता. त्याला चार ते पाच मित्रांनी एक सेकंड हॅंड ऑटो विकत घेऊन दिला. काही दिवसांतच तो नागपुरातील ऑटोचालक संघटनेचा नेता झाला. त्याची ओळख कुख्यात गुंड राजू भद्रे याच्याशी झाली. काही ऑटोचालकाला हाती धरून रणजितने गँग बनवली. भद्रेशी हातमिळवणी केल्यानंतर रणजितने गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवले. काही महिन्यातच स्वतःची गँगस्टर म्हणून ओळख निर्माण केली. राजू भद्रेच्या मैत्रीपोटी त्याने नागपूर सोडले आणि कामठीत बस्तान मांडले. येथे त्याने अवैध दारूविक्री, जुगार, मटका आणि ड्रग्सविक्रीमध्ये हात आजमावला. मोठमोठ्या व्यापाऱ्यांना 'प्रोटेक्शन मनी'च्या नावावर खंडणी मागणे, शहरातील भूखंड हडपणे, बळजबरीने गरिबांची घरे खाली करणे, कब्जा मारणे आणि सुपारी घेण्याचे काम करायला लागला. २००७ मध्ये सर्वाधिक शक्तीशाली गँगचा लिडर म्हणून रणजित उदयास आला. ४० रुपयांच्या देशीची पावटी पिण्यासाठी धावपळ करणारा रणजित २०१८ मध्ये अचानक कोट्यधीश झाला. 

हेही वाचा - नागरिकांनो, कोरोना फोबियाच्या विळख्यात अडकू नका; कोरोना हा सामान्य आजारासारखा आजार

राजकीय वरदहस्त - 
गुन्हेगारीत टॉपवर असलेल्या रणजितला एक माजी मंत्री तथा आमदाराने हेरले. गुंडाच्या टोळींचा राजकीय फायद्यासाठी वापर करण्याचा सल्ला दिला. त्या माजी मंत्र्याच्या पायाची धूळ डोक्याला लावून रणजितने राजकीय प्रवास सुरू केला. टोळीचा वापर त्या आमदाराच्या फायद्यासाठी करायला लागला. राजकीय वरदहस्त लाभल्याने तो कामठी नगरपरिषदेत निवडून आला आणि नगर उपाध्यक्ष बनला. नंतर त्याने आमदारालाही चॅलेंज देणे सुरू केले. 

ब्लॅकमेलिंगसाठी श्रीराम सेना - 
गोमांस विक्री, कत्तलखाना आणि गोतस्करीत कोट्यवधीची उलाढाल होत असल्याचे रणजितच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने अशा व्यापाऱ्यांकडून खंडणी, पठाणी वसुली करण्यासाठी श्रीराम सेना स्थापन केली. त्या माध्यमातून वसुली सुरू केली. श्रीराम सेनेची फ्रॅंजाईजी घेणाऱ्याला दोन लाख रुपये आणि कार्यालयाची जागा आणि कार्यालयाचा कायमचा खर्च देण्याची योजना आखल्यामुळे जवळपास महाराष्ट्रात श्रीराम सेना पसरली असल्याची माहिती आहे. 

हेही वाचा - कुंभकर्णाच्या पुढ्यातच रावणाचे दहन, देशातील सर्वात...

स्वतःच्या जिवाची भीती -
रणजितने आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या हत्याकांडाची सुपारी पाच कोटीत घेतली. कुठेही समोर न येता कालू हाटेकडून हत्याकांड घडविले. तसेच कुख्यात मनीष श्रीवास याची टोळी मोठी होत असल्यामुळे स्वतःच्या जिवाच्या भीतीने मनीषचा खून केला. शेवटी दोन्ही हत्याकांडात त्याचा चेहरा समोर आला. सीपी अमितेश कुमार हे एन्काऊंटर करतील या भीतीने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी अनेक राज्यात पळत होता. शेवटी त्याला जेरबंद करून नागपूर पोलिसांनी एका दहशतीचा अंत केला. 

go to top