Online teaching schools On the target
Online teaching schools On the target 
नागपूर

ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या शाळा रडारवर, शाळा संचालकांवर कारवाई करण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : केजी वन, टू व नर्सरी चालकांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईनचे शिक्षण देत असून शुल्काची वसुली करीत आहे. या वर्गाकरता ऑनलाईन शिक्षणसंदर्भात कुठलेही आदेश नाही. हे वर्ग नियमबाह्य आहे. अशाप्रकारचे वर्ग घेणारे शिक्षण विभागाच्या रडावर आहेत. अशा शाळा संचालकांवर कारवाई करण्याचा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी दिला. 

कोरोनाच्या पाश्वभुमीवर मार्चच्या मध्यापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यंदा विद्यार्थ्यांच्या परीक्षाही घेता आल्या नाहीत. दिवसागणिक रुग्ण संख्या वाढतीवर असल्याने गर्दी टाळण्याचे आवाहन सरकार करीत आहे. सध्या टाळेबंदीत शिथिलता दिली असली तरी निर्बंध कायम आहे.

हेही वाचा - पाहुणा म्हणून आलेल्या आतेभावाने केला बलात्कार...
राज्य शासनाने शाळा सुरू करण्याबाबत काही निर्देश जारी केले असून त्यात प्राथमिक व पूर्व प्राथमिकचा उल्लेखही नाही. त्यानंतरही शहरातील काही विना अनुदानित खाजगी शाळांनी प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू केलेत. शिक्षण उपसंचालकांनी सुद्धा शाळा सुरू करण्याचे आदेश येतपर्यंत विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे शिक्षण देवू नये, असे स्पष्ट निर्देश दिलेत. तर पालकही ऑनलाईन शिक्षणाच्या विरोधात आहे. त्यानंतरही अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षणाच्या नावाने शुल्क वसूली सुरू केली आहे. याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्यात. 

भरारी पथक नियुक्त
केजी 1 व 2 चे ऑनलाईन वर्ग घेता येत नाही. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या. याकरता भरारी पथक नियुक्त करण्यात आले. त्यांच्या भेटीत अशा प्रकारचे वर्ग होत असल्याचे दिसून येताच कारवाई करण्यात येईल. 
-चिंतामण वंजारी,
प्राथमिक शिक्षणाधिकारी,जि.प. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT