The origin of the "No Man's Land" locusts in India-Pakistan 
नागपूर

1962 नंतर त्यांनी पुन्हा केले आक्रमण, पण काढावा लागला पळ...

मंगेश गोमासे

नागपूर : नागपुरातील काटोल आणि कळमेश्‍वर तालुक्‍यात टोळधाडीने हल्ला करून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या टोळधाडीचे उगमस्थान भारत आणि पाकिस्तानमधील "नो मॅन्स लॅन्ड' या परिसरातून झाले असल्याची माहिती समोर आली. तब्बल 1962 नंतर टोळधाड नागपूरमध्ये आल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सेंटर फॉर सेरिक्‍चलर ऍण्ड बायोलॉजिकल पेस्ट मॅनेजमेंट रिसर्चचे (सीबीएसआर) संचालक डॉ. मनोज रॉय यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

हिरवीगार शेत, मळे टोळधाडीचे खाद्य आहे. त्याच्या शोधात शेकडो मैल टोळधाड प्रवास करतात. आफ्रिका देशांमध्ये टोळधाडीचे प्रमाण अधिक आहे. आपल्याकडे साधारणत: पाकिस्तानातून गुजरातमार्गे टोळधाड भारतात दाखल होत असते. यावेळी टोळधाडीची संख्या बरीच मोठी आहे.

गुजरात, राजस्थान यानंतर मध्य प्रदेश आणि आता राज्यातील नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि कळमेश्‍वर या तालुक्‍यात टोडधाडीने मोठे नुकसान केल्याचे दिसून येते. निरीक्षण केले असता, त्या गुलाबी रंगाच्या असल्याचे आढळून आले आहे.

शिवाय त्या केवळ तीन ते चार दिवसांत मोठ्या झाल्या आहेत. 8 ते 9 दिवसात त्या प्रजनन करण्यास सक्षम होणार आहेत. त्यापूर्वीच त्यावर नियंत्रण न मिळाल्यास त्या विक्राळ रूप धारण करतील असा इशारा डॉ. रॉय यांनी दिला. मंगळवारी (ता.26) डॉ. मनोज रॉय यांच्यासह त्यांचे विद्यार्थी डॉ. विजय राऊत, डॉ. प्रशांत चव्हाण यांनी सकाळी त्यांनी कळमेश्‍वर परिसरात तपासणी केली. त्यातूनच हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

हा आहे उपाय


डॉ. मनोज रॉय यांनी घेतलेल्या नमुन्यानुसार टोळधाड उष्ण वातावरणात अधिक प्रमाणात विकसित होत असून हिरवळीत वाढतात. विमान वा ड्रोन याद्वारे रसायन शिंपडले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. सायंकाळी हा झुंड जमिनीवर बसतो. त्यावेळी त्याच्यावर केमिकल टाकून नियंत्रण मिळविता येणे शक्‍य आहे. नेमके किती रसायन वापरावे हे त्या क्षेत्रातील नागरिक, प्राणी, पक्षी आणि इतर गोष्टींना ध्यानात घेऊन करणे गरजेचे आहे. टोळधाड जिथे मानवी वावर नसतो, तिथेच प्रजनन करीत असल्याने अशा क्षेत्रांचा शोध घेणे आवश्‍यक आहे.

1962 ला मध्य प्रदेशात प्रादुर्भाव


यापूर्वी 1962 साली मध्य प्रदेशात अशाप्रकारे टोळधाडीने कहर केला होता. शेतीचे अपरिमित नुकसान केल्याने सरकारने त्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली होती. यासाठी कॅनडाची सरकारने मदत घेतली होती. हवेच्या दिशेने जाणारे टोळधाड जिथे हिरवळ दिसते, त्या ठिकाणी थांबून ती फस्त करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

Shendurwada News : जप्त केलेला जेसीबी रात्रीच गायब; महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारावर प्रश्नचिन्ह?

Manchar Accident : मंचरमध्ये भीषण अपघात; युवक ठार, युवती गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT