murder
murder murder
नागपूर

Nagpur Crime : सावकाराच्या त्रासाला कंटाळून वाडी येथील महिलेने संपविले जीवन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - कर्ज आणि सावकार महिलेकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. यामुळे मात्र, तिची वर्षभराची चिमुकली मातृछत्र हरवून बसली आहे. वाडी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आठवा मैल परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. छळणाऱ्या सावकार महिलेविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

कीर्ती राहुल मेश्राम (२८) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ती मंडपे ले आउट वॉर्ड क्रमांक ३ मध्ये भाड्याच्या घरात पती व एक वर्षाच्या मुलीसह राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात राहणाऱ्या ओळखीच्या महिलेकडून काही दिवसाअगोदर ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या रक्कमेवरील व्याज वाढत गेले.

कर्ज देणारी महिला सावकार वारंवार तिच्या घरी पैशाची मागणी करीत होती. आज सकाळी पुन्हा ती महिला घरी आली. वाद घातला. काही वेळाने कीर्तीने मुलीला जवळच राहणाऱ्या आई-वडिलांकडे सोडले व परत घरी येऊन दुपारी तीन वाजताच्या सुमारास छताच्या हुकला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती पती राहुल मेश्राम व पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहचले. पंचनामाकरून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. अधिक तपास पोलिस करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : ''तू निवडून कसा येतो तेच बघतो'' अजित पवारांनी धमकी दिलेल्या 'त्या' तीन उमेदवारांचं काय झालं?

Ind vs Ire : ओपनिंगपासून ते मिडल ऑर्डरपर्यंत बदले टीम इंडियाचे चित्र... जाणून घ्या आयर्लंडविरुद्ध कशी असेल Playing-XI

Sharad Pawar : ''जरांगेंबद्दल माहिती नाही, पण सरकारमध्ये नाराजी होती'', शरद पवारांनी सांगितलं विजयाचं कारण

Nagpur Lok Sabha Election Result : विजयाची हॅट्‌ट्रिक! गडकरींकडून ठाकरे पराभूत

Latest Marathi News Live Update: राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार?

SCROLL FOR NEXT