Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Maharashtra India Latest Lok Sabha Result: देश-विदेश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला याठिकाणी वाचायला मिळतील.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal

Lok Sabha Election: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया नियामानुसारच

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया ही संपूर्णपणे निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसारच पार पाडण्यात आल्याचे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

PM Modi: यूएईच्या अध्यक्षांच्या पंतप्रधान मोदींना शुभेच्छा

यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन अल नहाय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुकीत यश मिळवल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

Weather Updates: पाऊस आज, उद्या महाराष्ट्राला झोडपणार

दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तर, उद्या दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता.

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम 12 जूनपर्यंत वाढला

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील (Pune Porsche Accident) अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम १२ जूनपर्यंत वाढला आहे. अद्याप मुलाचे समुपदेशन सुरू आहे. तसेच व्यसनाधिनतेबाबत देखील त्याला समुपदेशन करण्यात येत आहे. सुधारगृहातून सुटका झाल्यास त्याच्या जीविताला धोका आहे, अशी माहिती मंडळातील सरकारी वकील आणि पोलिसांनी (Pune Police) मंडळाला दिली.

Amit Shah : पंतप्रधान मोदींची एनडीएचा नेता म्हणून निवड झाल्याबद्दल अमित शहांनी केलं अभिनंदन

पंतप्रधान मोदी यांची एनडीएचा नेता म्हणून एकमताने निवड झाल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटव्दारे अभिनंदन केले आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेली 10 वर्षे मोठ्या प्रमाणावर विकास आणि कल्याणाचं काम झालं आहे. यापुढे आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी वचनबद्ध आहोत."

JP Nadda : एनडीएच्या घटक पक्षांनी भाजप अध्यक्षांना पाठिंब्याची पत्रे केली सादर

पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू असलेली एनडीएच्या घटक पक्षांची बैठक नुकतीच संपलीये. बैठक संपल्यानंतर आता एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना पाठिंब्याची पत्रे सादर केल्याचे कळत आहे.

Sangli Lok Sabha : काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेणार?

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याबाबत विशाल पाटील यांच्याकडून कोणाताही दुजोरा मिळालेला नाही. सांगली लोकसभा विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून लढवली होती. मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून ते पाठिंबा देणार असल्याचे कळतंय.

Sanjay Raut : नितीश कुमार, चंद्राबाबू हे सर्वांचे आहेत - संजय राऊत

नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांनी काँग्रेससोबतही काम केलं आहे, त्यामुळे ते सर्वांचे आहेत. नरेंद्र मोदींचे काम हम करे सो कायदा आहे असं आहे. त्यामुळे त्याला इतर पक्षांना घेऊन सरकार चालवणं कठीण आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.

Devendra Fadnavis : फडणवीस यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची सागर बंगल्याजवळ घोषणाबाजी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याजवळ समर्थनार्थ कार्यकर्त्यांची घोषणाबाजी करण्यात येत आहे.

सर्व घटक पक्षांकडून एनडीएचा नेता म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड

दिल्ली : सर्व घटक पक्षांकडून एनडीएचा नेता म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आल्याचे कळत आहे. इथे क्लिक करा

Sanjay Raut : इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी संजय राऊत दिल्लीत दाखल

शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभाग होण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

Kalpana Soren : मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक, माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी दिल्लीत दाखल

JMM आमदार आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन ह्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत.

राष्ट्रपतींनी १७ वी लोकसभा केली भंग

राष्ट्रपतींनी १७ वी लोकसभा भंग केली आहे. एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करणार.

अल्पवयीन आरोपीच्या आई-वडिलांना १० जूनपर्यंत तर पोलिस कोठडी

पुणे कार अपघात प्रकरणात न्यायालयाने अल्पवयीन आरोपीच्या आई-वडिलांना १० जूनपर्यंत तर डॉ.श्रीहरी हलनोर, डॉ. अजय तावरे, अतुल घाटकांबळे यांना ७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील, आई, ससून रुग्णालयाचे दोन डॉक्टर डॉ. अजय टावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर आणि एक कर्मचारी अतुल घाटकांबळे यांना जिल्हा न्यायालयात हजर केले होते.

दिल्लीत एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी एनडीएचे नेते पोहोचले

दिल्लीत एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी एनडीएचे नेते 7, एलकेएम येथे पोहोचले

देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर महायुतीची बैठक सुरु...

महाराष्ट्रात पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक सुरु आहे. महायुतीतील सर्व नेते या बैठकीसाठी आले आहेत.

Vijay Wadettiwar: देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेवर विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पद मुक्ततेवर महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, "हा भाजपचा अंतर्गत विषय आहे, त्यावर आम्हाला बोलण्याची गरज नाही. भाजपला जनतेने नाकारले आहे. महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे''

फडणवीसांनी सरकारमधून बाहेर पडू नये- चंद्रशेखर बावनकुळे

देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच पक्ष संघटनेसाठी काम करावं, त्यांनी सरकारमधून बाहेर पडू नये, असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

एका निवडणुकीने खचून जाण्याची गरज नाही- एकनाथ शिंदे

एका निवडणुकीने सगळं संपत नसतं.. पराभवाने खचून जाण्याची गरज नसून जय-पराजय होत असतात, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांच्या भूमिकेवर मत व्यक्त केलं

मला सरकारमधून मोकळं करा- देवेंद्र फडणवीस

राज्यामध्ये फिरुन पुन्हा निवडणुकीची तयारी करण्यासाठी मला सरकारमधून मोकळं करा, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Narendra Modi: राजीनामा देण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले  पपंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत.

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच सत्तास्थापनेचा दावा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची शक्यता आहे मात्र अजून आधिकृत घोषणा झालेली नाही.

Jayanta Patil: जयंत पाटील जाणार मातोश्रीवर

जयंत पाटील हे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत. नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे देखील ठाकरेंना भेटणार आहे.

Maharashtra News: राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार?

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला राज्यामध्ये डॅमेज कंट्रोल करावं लागणार आहे. त्यासाठी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

India Alliance : इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक; शरद पवार, सुप्रिया सुळे राहणार उपस्थित

इंडिया आघाडीची आज संध्याकाळी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे दिल्लीत पोहोचले आहेत. ते आज इंडिया आघाडीच्या बैठकीला राहणार उपस्थित राहणार आहेत.

PM केंद्रीय मंत्री परिषदेतील मंत्र्यांसाठी राष्ट्रपतींकडून आज रात्री ८ वाजता डीनर आयोजन

केंद्रीय मंत्री परिषदेतील मंत्र्यांना राष्ट्रपतींकडून आज रात्री ८ वाजता डीनरचे आयोजित करण्यात आले आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांसह विद्यमान सर्व मंत्री आणि राज्यमंत्री डिनरला उपस्थित राहतील. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, भागवत कराड, रामदास आठवले, भारती पवार उपस्थित राहतील.

PM Modi: PM नरेंद्र मोदींनी मानले इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे आभार मानले आहेत. तिसऱ्यांदा NDAला बहुमत मिळाल्यामुळे मोदींचं अभिनंदन केलं आहे.

NDA Meeting: एनडीएच्या बैठकीला फक्त राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार

दिल्लीमध्ये आज २ वाजता एनडीएची बैठक होणार आहे. याला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे उपस्थित राहतील अशी माहिती मिळाली आहे.

Sanjay Raut on Result: दोन बांबूवरचं सरकार कधीही पडू शकेल- संजय राऊत

भाजपला चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची गरज पडणार आहे. त्यामुळे दोन बांबूवरचं सरकार कधीही पडेल, अशी टीका ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केली आहे.

Nitish Kumar, Tejasvi Yadav: नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकाच विमानातून दिल्लीला रवाना

जेडीएसचे प्रमुख नितीश कुमार आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव एकाच विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. आज दिल्लीत एनडीए आणि इंडिया आघाडीची बैठक होणार आहे.

Mumbai: उत्तर मुंबईत पावसाला सुरुवात

उत्तर मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सून दोन दिवस आधीच राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. अचानक पाऊस सुरु झाल्याने लोकांची तारांबळ उडाली होती.

INDIA Alliance Meeting:  इंडिया आघाडीची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर इंडिया आघाडीची आज दिल्लीच महत्त्वाची बैठक होत आहे. सत्ता स्थापनेसाठी इंडिया आघाडीकडून प्रयत्न होणार असल्याचं कळत आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. एनडीएला बहुमत मिळाले आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीकडून सरकार स्थापन करता येईल का? याची पडताळणी सुरु आहे. भाजप आणि काँग्रेसकडून नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्याशी चर्चा सुरु असल्याचं सांगितलं जातं. आज दिल्लीत घडामोडींना वेग येणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com