Supriya Sule said NCP has always given Vidarbha a lenient measure Supriya Sule said NCP has always given Vidarbha a lenient measure
विदर्भ

...हा विदर्भावर दिल्लीचा अन्याय आहे; सुप्रिया सुळेंचा भाजपला टोमणा

सकाळ डिजिटल टीम

चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भाला नेहमीच झुकते माप दिले. राज्याच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे गृहखाते नागपूर जिल्ह्यातील आमदार अनिल देशमुख यांच्याकडे सोपविले. परंतु, नागपूरवरून त्यांच्यावर आरोप झाले. कुटुंबीयांवर तब्बल १०४ वेळा छापे टाकण्यात आले. हा विदर्भावर दिल्लीचा अन्याय आहे, असा टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपला लगावला. (NCP has always given Vidarbha a lenient measure)

सोमवारी (ता. ६) चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या. पहिल्यावेळी अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाले. त्यावेळी अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला. यानंतर राष्ट्रवादीचे (NCP) नेते नबाव मलिक यांनाही अशाच पद्धतीने अडविण्यात आले. हा खोट्या विरोधातील लढा आहे. हे सर्व षडयंत्र आहे, असा दावाही खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला.

राज्यसभेवर जाणाऱ्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणुकीला भाजपचा हट्टीपणा जबाबदार आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप नेत्यांशी यासदर्भात चर्चा केली. निवडणुकीत काही चुकीचे प्रकार होऊ शकतात, अशी कल्पना त्यांना दिली. उमेदवार मागे घेण्याची विनंती केली. मात्र, भाजपने (BJP) आपला उमेदवार उभा केला, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला.

समाजात अनेक ज्वलंत मुद्दे

समाजमाध्यमात पातळी सोडून बोलण्याची कुणालाही गरज नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. समाजात अनेक ज्वलंत मुद्दे आहे. महामागाईने नागरिक त्रस्त झाली आहे. त्यावर बोलण्याची गरज आहे, असेही खासदार सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT