Amravati : आमदार भुयार यांना तीन महिने कारावासाची शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Devendra Bhuyar sentenced to three months imprisonment

अमरावती : आमदार भुयार यांना तीन महिने कारावासाची शिक्षा

अमरावती : जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी जिल्हा परिषदेच्या सभेत गटविकास अधिकाऱ्याला माईक फेकून मारला होता. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होती. सोमवारी (ता. ६) जिल्हा न्यायालायाने भुयार यांना तीन महिने कारावासाची शिक्षा (sentenced) सुनावली. न्यायाधीश एस. एस. अडकर यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. (MLA Devendra Bhuyar sentenced to three months imprisonment)

जिल्हा परिषदेच्या सभागृहात २८ मे २०१९ रोजी पाणीटंचाईच्या विषयावर सभा आयोजित केली होती. त्यावेळी देवेंद्र भुयार जिल्हा परिषदेचे सदस्य होते. सभेत वरुड तालुक्यातील पाणीटंचाईबाबत गटविकास अधिकारी सुभाष शेषराव बोपटे हे माहिती देत असताना देवेंद्र भुयार यांनी बोपटे यांच्या दिशेने माईक व पाण्याच्या बॉटल फेकल्या होत्या.

गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी देवेंद्र भुयार यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. न्यायालयात एकूण सात साक्षीदार तपासले. यानंतर न्यायाधीशांनी देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांना तीन महिने साधा कारावास व १५ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची (imprisonment) शिक्षा (sentenced) ठोठावली.

जिल्हा परिषद सदस्य असताना नागरिकांच्या पाणीप्रश्नासाठी सभागृहात बोललो होतो. कुणालाही मारहाण केली नव्हती. यासंदर्भात जिल्हा न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य आहे. निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपिल दाखल करणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी सांगितले.

टॅग्स :Amravatiimprisonment