file photo
file photo 
विदर्भ

प्रधानमंत्री आवास योजनेची गती वाढता वाढेना

सकाळ वृत्तसेवा

अमरावती ः सर्वांना परवडणारी हक्काची घरे या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत चौथ्या घटकातील महापालिका क्षेत्रातील 1535 लाभार्थ्यांच्या घरांचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. तर 3884 लाभार्थ्यांना लवकरच लाभ मिळणार आहे. घरकुलांसाठी तीन डीपीआरला मंजुरी मिळाली असून महापालिका क्षेत्रात 5369 घरकुलांचे उद्दिष्ट गाठायचे आहे. घरकुल बांधकामाची गती मात्र मंद असून केवळ 28 टक्के घरकुल पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.
गत पंचवार्षिकमध्ये राजीव आवास योजनेचे रूपांतर प्रधानमंत्री आवास योजनेत करण्यात आले. चार घटकांत लाभार्थी निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यापैकी चौथ्या व तिसऱ्या घटकातील लाभार्थ्यांनी अर्ज केले. चौथ्या घटकांत आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. महापालिकेकडे आलेल्या एकूण अर्जदारांपैकी 5369 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट महापालिकेस मिळाले आहे. त्यातील पहिल्या डीपीआरमधील 3561 पैकी 948, दुसऱ्या डीपीआरमधील 1171 पैकी 364 व तिसऱ्या डीपीआरमधील 637 पैकी 223 लाभार्थ्यांच्या अर्जांना मंजुरी मिळाली असून एकूण 1535 लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांना नकाशे मंजूर करून घेऊन बांधकाम सुरू करण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती योजनेचे समन्वयन अधिकारी श्री. चौधरी यांनी दिली.
घरकुलासाठी या योजनेंतर्गत दीड लाख रुपये केंद्र व एक लाख रुपये राज्य सरकार देते. महापालिकेस शासनाकडून आतापर्यंत 58 कोटी 40 लाख रुपये प्राप्त झाले असून 19 कोटी 83 लाख रुपये खर्च झाले आहेत. एकूण उद्दिष्टांच्या 28 टक्के काम मार्गी लागले आहे. अनेक लाभार्थ्यांच्या अर्जातील त्रुट्या असल्याने त्या दुरुस्त करण्यात वेळ जात असल्याचे कारण सांगण्यात आले.
तिसऱ्या घटकात 860 लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी मिळाली असून सात जागा त्यासाठी निवडण्यात आल्या आहेत. खासगी भागीदारीतून हे घरकुल बांधण्यात येत असून म्हसला व बडनेरा येथे अनुक्रमे 54 व 41 घरकुलांचे बांधकाम सुरू झाले आहे. लाभार्थ्यांना या योजनेत अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे. त्यासाठी पन्नास हजार रुपये अनामत रक्कम भरायची असून प्रत्येक घरकुलाची किंमत साडेनऊ लाख रुपये आहे. 725 लाभार्थी समोर आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

SCROLL FOR NEXT