file photo
file photo 
विदर्भ

नायलॉन मांजा आला गळयाशी 

सकाळ वृत्तसेवा

भिवापूर (जि.नागपूर) ः पतंग उडविण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांज्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांना येथील ठाणेदार भोरतेकर यांनी कडक कारवाईचा इशारा दिल्याने मांजा विक्रेत्यांनी आता धसका घेतला आहे. 

हल्ली पतंग उडविण्याचा छंद असलेले शौकिन सुती धाग्याऐवजी नायलॉनचा मांजा अधिक वापरताना दिसतात. सहज व माफक दरात मिळत असल्याने पतंग शौकिनांत या नायलॉन मांजाची मोठी "क्रेज' वाढत आहे. हा मांजा पतंग उडविणाऱ्यांसाठी सोईचा असला तरी इतरांसाठी मात्र तो जीवघेणा ठरत आहे. उडणारी पतंग या मांज्यापासून वेगळी झाल्यानंतर मांजा खाली येतो. खाली येताना एखाद्या वाहनचालकाच्या शरीराला हा मांजा गुंडाळला की, त्या ठिकाणी इजा होऊन प्राणहानी होण्याची शक्‍यता असते.

यापूर्वी नायलॉन मांजामुळे अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना घडू नये याकरिता शासनाने नायलान मांज्याच्या वापरावर बंदी लादली आहे. तरीही शहरात काही ठिकानी नायलॉन मांजाची विक्री सुरू आहे. ही विक्री ताबडतोब बंद करून असलेला नायलॉन मांजा नष्ट करण्याच्या सूचना देत कारवाईचा इशारा पोलिस ठाण्याकडून मांजा विक्रेत्यांना देण्यात आला आहे. पालकांनीही त्यांच्या मुलांना नायलॉन मांज्याचा वापर करण्यास सक्‍तीने मनाई करावी, असे आवाहन ठाणेदार भोरतेकर यांनी केले आहे. 

दुर्घटना होण्याची शक्‍यता 
येथील आझाद चौक परिसरात राहणारे प्रमोद लोहकरे हे गत रविवारी दुचाकीने घरून बसस्थानकाकडे येत असताना अचानक त्यांच्या मानेला नायलॉनचा मांजा गुंडाळून मानेला हलकी इजा झाली. दुचाकीची गती कमी असल्याने लोहकरे यांनी लगेच दुचाकी थांबवली. त्यामुळे ते मोठी दुखापत होण्यापासून बचावले. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नायलॉन मांजा हद्दपार करण्याची आवश्‍यकता असल्याचे मत लोहकरे यांनी व्यक्त केले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT