dam
dam 
विदर्भ

प्रकल्पग्रस्तांनी पाडले 'जिगाव' चे काम बंद

सकाळवृत्तसेवा

नांदुरा : जिगाव प्रकल्पातील सर्व गावातील कलम ११ पासून कलम २१ पर्यंतच्या मागण्या व संबंधित समस्यांचे निराकरण होत नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू होऊ देणार नाही या मागण्यासाठी २५ मे रोजी लोकांनी आंदोलन करीत प्रकल्पाचे काम बंद पाडले असून आज (ता. २६) तिसऱ्या दिवशीही हे काम बंद असून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तर दिली जात आहेत.

जिगाव प्रकल्पाचे या वर्षीचे चाळीस टक्के पाणी अडविण्याचे स्वप्न आखून प्रशासन असले तरी प्रकल्पातील बाधित गावांच्या समस्या पाहिजे त्या प्रमाणात निकाली काढण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे.अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासन ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रकपग्रस्तांनी हरिष रावळ यांच्या नेतृत्वात दि.२५ मे रोजी धरणाचे काम बंद पाडले व जोपर्यंत जिगाव प्रकल्पातील सर्व गावांचे कलम ११ पासून कलम २१ पर्यंत मागण्या व समस्यांचे निराकरण होत नाही तोपर्यंत हे काम बंदच ठेवण्याची ठाम भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली असून वेळ आल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असतांनाही अधिकारी या प्रकाराकडे कानाडोळा करीत असल्याचेच दिसून येत आहे.याबाबत या प्रकल्पाचे अधिकारी जुनेजा यांचेशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता हेतुपुरस्पर संपर्क क्षेत्राचे कारण समोर करून वेळोवेळी त्यांनी याबाबत माहिती देण्याचे टाळले.इतरही संबंधित अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करीत असले तरी महत्वाच्या या प्रकल्पाच्या बांधकामावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याने ऐन दुष्काळी सालासाठी व पाणीटंचाईसाठी वरदान ठरणाऱ्या जिगाव प्रकल्पाबाबत शासन किती उदासीन आहे.हेच या प्रकारावरून समोर येत आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या सर्व गावांच्या नागरिकांनी पक्षीय राजकारणाला मुठमाती देत एकजुटीने हे आंदोलन पुकारले असून हरीश रावळसह तालुक्यातील पं.स.अर्चनाताई पाटील,उपसभापती प्रभाकर वानखेडे,शिवाजीराव पाटील,राजू काटे,संतोष डीवरे,पुरुषोत्तम झालटे,विजू काळे,राम पांडव,भागवत मुंडे यांचे सोबतच प्रकल्पग्रस्त गावांचे सरपंच व नागरिकांनी 'आधी मागण्या पूर्ण करा मगच धरण करा' ची हाक दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT