file photo
file photo 
विदर्भ

गजबच झाले! चोरांच्या बेवारस दुचाकी चोरांनीच चोरल्या, पोलिसांनी केल्या दहा दुचाकी जप्त

संतोष ताकपिरे

अमरावती : चोरांनी दुचाकी चोरल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्या बेवारस सोडल्या. मात्र विल्हेवाट लावण्यासाठी मूळ चोरट्यांनी उचलण्यापूर्वीच त्या दुचाकी अन्य काही चोरांनी चोरून नेल्या. म्हणजे चोरांनी चोरलेल्या दुचाकींचीही अनेकदा चोरी झाल्याची बाब पुढे आली आहे.

याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी (ता. सात) चौघांना अटक केली. त्यांच्याकडून आयुक्तालयाच्या हद्दीतून चोरलेल्या दहा दुचाकीही जप्त केल्या. सूरज ऊर्फ मोंटू गणेश तानोडे (वय २५) व तेजस राजेंद्र गायकवाड (वय २०, दोघेही रा. नवसारी), विजय ऊर्फ वैभव प्रकाश भगत (वय २१, रा. पोटी, जि. वाशीम), सूरज ज्ञानदेव पाटील (वय २२, रा. मंगरूळपीर), अशी अटकेतील चौघांची नावे आहेत.

तानोडे हा दुचाकी चोरायचा. त्याच्या संपर्कात तेजस होता. तेजसची नवसारी परिसरात पानटपरी आहे. तेजस हा विजय ऊर्फ वैभव यांच्या संपर्कात अनेक दिवसांपासून आहे. विजय हा मूळ मोटार मॅकेनिक असून त्याचे गॅरेज आहे. विजयच्या संपर्कात सूरज पाटील होता, अशी ही दुचाकी चोरून विल्हेवाट लावणाऱ्यांची साखळी आहे.

चोरटे दुचाकीला निर्जनस्थळी ठेवायचे

तानोडे हा दुचाकी चोरत होता. चोरलेली दुचाकी त्याला ग्राहक मिळेपर्यंत तशीच बेवारस निर्जनस्थळी ठेवली जात होती. दुचाकी चोरल्यानंतर तेजसला माहिती पुरविली जायची. तेजस त्याच दुचाकी पुढे वाशीम जिल्ह्याच्या मंगरूळपीरला भगत व पाटील या दोघांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली.

चार दुचाकी जप्त

चार दुचाकी या विजय ऊर्फ वैभव याच्या पोटी येथील गॅरेजमधून जप्त झाल्या; तर उर्वरित सहा दुचाकी या शहरातून तानोडे व गायकवाड यांच्याकडून जप्त करण्यात आल्या. त्यापैकी काही विकल्या होत्या तर काही चोरून जेथे बेवारस सोडल्या तेथून पोलिसांनी जप्त केल्या. जप्त दुचाकी या गाडगेनगर, फ्रेजरपुरा, कोतवाली ठाण्याच्या हद्दीतून चोरल्या होत्या. चौघांनाही न्यायालयाने मंगळवारी (ता. 10) पोलिस कोठडी सुनावली.


चोरही झाले हायटेक

चोरलेल्या दुचाकींची विल्हेवाट वाशीम जिल्ह्यातील भगत व पाटील हे लावायचे. जेवढ्या दुचाकी घेतल्या त्याचे ठरलेले पैसे हे नवसारीच्या तेजस गायकवाडच्या खात्यात पेटीएमने जमा व्हायचे. तेजस स्वत:ची रक्कम कापून उर्वरित सूरज तानोडे यास पाठवित होता.
 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan: RBIने जाहीर केली गृहकर्जाची धक्कादायक आकडेवारी; गेल्या 2 वर्षात झाली 10 लाख कोटी रुपयांची वाढ

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

SCROLL FOR NEXT