नागपूर : भविष्य निधी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. कर्मचाऱ्यांनी एकत्र येत मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले.
नागपूर : भविष्य निधी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. कर्मचाऱ्यांनी एकत्र येत मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले.  
विदर्भ

भविष्य निधी कर्मचारी संघटनेचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांसाठी भविष्य निधी कर्मचारी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सोमवारी काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी मागण्यांकडे लक्ष वेधले. बुधवारी (ता. 28) संपाची हाक दिली असून, संप शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. पीएफ कार्यालयातील क्‍लास बी, सी व डी प्रवर्गाची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. परंतु, ती भरली जात नाहीत. केवळ आयुक्तांचीच पदे भरली जात आहेत. अपुऱ्या संख्येमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. 15 वर्षांपासून कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळालेली नाही. याशिवाय भविष्य निधी कार्यालयात श्रेणी फेररचना करताना केवळ "अ' दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच लाभ मिळाला. इतर कर्मचाऱ्यांच्या श्रेणीत फेररचना केली नाही. यामुळे पदोन्नतीसह वेतनातही मोठ्या प्रमाणावर तफावत निर्माण झाली आहे. वारंवार मागण्या रेटूनही पूर्ण होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोष आणि संतापाचे वातावरण आहे. यापुढे अन्याय सहन करणार नाही. संपूर्ण शक्तीनिशी सरकारच्या कर्मचारीविरोधी धोरणाचा निषेध केला जाईल. सध्याचे केडर रिस्ट्रक्‍चरिंग म्हणजे ब, क व ड श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. भविष्य निधी कर्मचारी संघटनेचे सचिव विजय ठाकरे यांच्या नेतृत्वातील आंदोलनात सुभाष भेलोसे, दिनेश जामभोरे, अरुण कुंभारे, प्रशांत कांबळे, दत्तू मुंदलकर, वसंता धार्मिक, गणपती नंदनवार यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT