Railway-Ticket
Railway-Ticket 
विदर्भ

रेल्वेचे प्रिंटेड कार्ड तिकीट इतिहासजमा

सकाळवृत्तसेवा

नागपूर - रेल्वेच्या भाषेत ‘पॅसेंजर हॉल्ट’ संबोधल्या जाणाऱ्या छोट्या रेल्वेस्थानकांवर प्रिंटेड कार्ड तिकीट आतापर्यंत होते. त्यावर होणारा अफाट खर्च कमी करण्यासाठी कार्ड ऐवजी यूटीएस तिकीट देण्याचा निर्णय दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. कार्ड तिकीट इतिहासजमा झाल्यामुळे वार्षिक पावणे दोन कोटींची बचत होणार आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत सर्वच रेल्वेस्थानकांवरून मिळणाऱ्या प्रिंटेड कार्ड तिकिटांची जागा कागदी तिकिटांनी घेतली. आता ऑनलाइन तिकीट घेतले जाऊ लागले आहे. विकासाच्या या टप्प्यांत पॅसेंजर हॉल्ट मागे राहिले खरे; पण त्यामुळे कार्ड तिकिटाची जुनी परंपरा जपली गेली होती. रेल्वेच्याच प्रिंटिंग प्रेसमध्ये कार्ड तिकीट छापले जाते.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेअंतर्गत ५३ हॉल्ट पॅसेंजर असून, त्यातील काही ठिकाणी कार्ड तिकीटच उपलब्ध करून दिले जायचे. परंतु, कार्ड तिकीट तयार करण्याची प्रक्रिया वेळ खाऊ होती.

शिवाय एका तिकिटासाठी ३.९७ पैसे म्हणजेच जवळपास ४ रुपये खर्च होत होतो. दुसरीकडे यूटीएस तिकिटासाठी येणारा खर्च केवळ १५ पैसेच आहे. वेळ व खर्चाची बचत म्हणून यूटीएस तिकीट सुरू केले आहे.

पद्धत जुनीच
प्रिंटेड तिकिटांप्रमाणेच यूटीएस तिकीटही पहिलेच प्रिंट करून घेतले जातील. कुठून ते कुठवर प्रवास, भाडे किती याची माहिती पूर्वीपासूनच अंकित असून केवळ प्रवासाची तारीख आणि वेळ ही जागा सोडलेली आहे. स्टेशन मास्टर, बुकिंग क्‍लर्क किंवा तिकीट एजंट पूर्वीप्रमाणेच सील लावून रिकाम्या जागेवर माहिती भरतील.

तिकिटांचे अर्थकारण
दपूमरेच्या नागपूर, बिलासपूर, रायपूरअंतर्गत कार्ड तिकीट मिळणाऱ्या पॅसेंजर हॉल्टवरून वार्षिक सरासरी ४५ लाख तिकिटांची विक्री होते. एका कार्ड तिकिटाचा खर्च ३.९७ रुपये आहे. म्हणजेच या तिकिटावर १.८० कोटींचा खर्च येतो. दुसरीकडे यूटीएस तिकीटचा खर्च १५ पैसे आहे. यानुसार वार्षिक खर्च ६.७० लाख रुपये येईल म्हणजेच रेल्वेची वार्षिक १.७३ कोटींची बचत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : दोघांची नजर प्लेऑफच्या तिकीटावर... पण चेन्नई घेणार पंजाबकडून मागील पराभवाचा बदला

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT