file photo
file photo 
विदर्भ

शहरातील 172 उद्यानांत रेन वॉटर हार्वेस्टिंग

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरावरील जलसंकटाने महापालिकेचे डोळे उघडले असून, आता रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी आग्रह धरला जात आहे. शहरातील महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासच्या एकूण 172 उद्यानांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे. याशिवाय महापालिकेचे झोन कार्यालय इमारती, विविध कार्यालयांच्या इमारतीतही रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या कामास तातडीने सुरुवात करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी आज प्रशासनाला दिले.
शहरात बुधवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. भविष्यात भूगर्भातील पाणीही मिळणे कठीण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिकेने आता रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी आग्रह धरला. स्थायी समितीच्या आज झालेल्या बैठकीत रेन वॉटर हार्वेस्टिंगवर चर्चा झाली. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी एका इमारतीवर अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच प्रत्येक इमारतीच्या शहरातील महापालिकेच्या 117 व नागपूर सुधार प्रन्यासच्या 172 उद्यानांत रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी प्राकलन सात दिवसांत तयार करावे, असे निर्देश पोहाणे यांनी दिले. ही कामे तातडीने सुरू करून दर 15 दिवसांनी प्रगतीचा अहवाल स्थायी समितीपुढे ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान, उद्यान विभागाचे विकेंद्रीकरण करण्यासही त्यांनी सांगितले. त्यामुळे उद्यान विभागाशी संबंधित कामे आता प्रत्येक झोनमध्ये होईल. ग्रेट नाग रोडवरील नासुप्र सभागृहाच्या बाजूच्या जागेवरील अतिक्रमण काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT