खासदार धानोरकर
खासदार धानोरकर 
विदर्भ

शेतकऱ्यांच्या समस्या 15 दिवसांत सोडवा ः खासदार धानोरकर

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : गेल्या दोन वर्षांपासून टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला न देता, टॉवरचे काम पूर्ण करणाऱ्या पॉवरग्रिडच्या अधिकाऱ्यांचा खासदार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर यांनी चांगलाच "क्‍लास' घेतला. येत्या 15 दिवसांत शेतकऱ्यांचे पुर्नमुल्याकन करून मोबदला देण्याबाबतही त्यांनी खडसावले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता. 15) ही बैठक झाली. वरोरा ते परळी, वरोरा ते हैदराबाद येथे वीज घेऊन जाण्यासाठी पॉवरग्रिडने टॉवर उभारले आहेत. त्यात वणी, घाटंजी व आर्णी तालुक्‍यांत अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मनोरे उभारण्यात आले आहेत. त्यातील अनेक मनोऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळालेला नाही. या प्रश्‍नावर खासदार धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यासमवेत पॉवरग्रिडच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या पिकांचे पुर्नमूल्यांकन करून त्यांना योग्य पीक मोबदला देण्यात यावा, साहित्यांची ने-आण करताना ज्यांच्या शेतातून वाहतूक होत आहे, अशा शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देशही खासदार धानोरकर यांनी दिले. वणी, घाटंजी व आर्णी तालुक्‍यांतील शेतकऱ्यांचे प्रश्‍न 15 दिवसांत निकाली काढण्याचे आदेशही धानोरकर यांनी दिले. या बैठकीला माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT