Rishikesh Ambuskar selected for Black Hat Asia Conference 2019
Rishikesh Ambuskar selected for Black Hat Asia Conference 2019 
विदर्भ

ऋषिकेश अम्बुस्करची 'ब्लॅक हॅट एशिया कॉन्फरन्स 2019'साठी निवड

सकाळवृत्तसेवा

शेगाव : श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ऋषिकेश राजेश अम्बुस्कर या विद्यार्थ्याची सिंगापूर येथील 'ब्लॅक हॅट एशिया कॉन्फरन्स 2019' साठी निवड झाली आहे. तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता 'सायबर सेक्युरिटी' संदर्भात ही संस्था काम करते. दिलेले टास्क पूर्ण केलेल्या अभियंत्यांची निवड करून त्यांना या कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाते.

महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान विभागात द्वितीय वर्षाला शिकत असलेल्या ऋषिकेश अम्बुस्कर या विद्यार्थ्याने 'ब्लॅक हॅट एशिया'ने दिलेले टास्क यशस्वीरीत्या पूर्ण केले. यासाठी त्याला 'ब्लॅक हॅट एशिया'तर्फे 900 डॉलरची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. 27 मार्च ते 29 मार्च 2019 या दरम्यान ही कॉन्फरन्स सिंगापूर येथे मरीना बे सॅण्ड हॉटेल मध्ये आयोजित केली आहे.

युनायटेड बिजनेस मेडिया एल. एल. सि. सैन फ्रांसिस्को, अमेरिकेचा एक भाग असलेली यु.बि. एम. टेक तर्फे 'ब्लॅक हॅट एशिया कॉन्फरन्स' दरवर्षी आयोजित केली जाते. जगभरातून अनेक अभियंते कॉन्फरन्सला उपस्थित असतात. तीन दिवस चालणाऱ्या या कॉन्फरन्समध्ये संशोधक, उद्योग जगतातील मान्यवर, तज्ज्ञ, अभियंते सहभागी होऊन अद्ययावत माहितीची आदान-प्रदान होणार आहे. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांतर्फे प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार आहे. महाविद्यालयाचे संचालक श्रीकांतदादा पाटील, प्राचार्य डॉ. एस. बि. सोमाणी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. अमित मानेकर तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हाकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT