file photo
file photo 
विदर्भ

पालकांना अर्ज दुरुस्ती करण्याची पुन्हा संधी

सकाळवृत्तसेवा

नागपूर  : मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्के प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी पालकांना नव्याने अर्जात दुरुस्ती करण्याची संधी बुधवारपासून (ता. 29) उपलब्ध करून दिली आहे. पालकांना चार जूनपर्यंत दुरुस्ती करता येईल. त्यामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आरटीईच्या दुसऱ्या फेरीस सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. मात्र, त्याबद्दल कोणतीही सूचना शिक्षण विभागाकडून अद्याप मिळालेली नाही.
राज्यातील 9 हजार 195 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 779 प्रवेशाच्या जागा दर्शविल्या आहेत. राज्यात 8 एप्रिलला आरटीईची पहिली सोडत काढली होती. पहिल्या फेरीत राज्यात 60 हजार 706 विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यातील 44 हजार 983 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. 20 मेपासून दुसरी फेरी सुरू होणार असल्याची चर्चा होती. मात्र, ती न झाल्याने पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आरटीईची तिसरी फेरी जूनच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून वेळेत पूर्ण होणार नसल्याचे दिसून येते. यामुळे वेळापत्रक यंदाही कोलमडणार असल्याची चिन्हे आहेत. सोमवारी (ता. 27) प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून पालकांनी केलेल्या अर्जात दुरुस्तीसाठी संधी देण्याचे पत्र काढण्यात आले. पत्रानुसार ज्या पालकांनी अर्ज "कन्फर्म' केलेले नाही, त्यांना ते "कन्फर्म' करता येणार आहे. चुकलेले गुगल लोकेशन दुरुस्तही करता येणार आहे. शिवाय पडताळणी समितीने पालकांच्या तक्रारींची खात्री करून तांत्रिक चुका दुरुस्त करणे आदींचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय बालहक्क आयोगाने हस्तक्षेप केला होता. त्यासाठी आरटीई ऍक्‍शन समितीद्वारे शाहिद शरीफ यांनी आयोगाकडे तक्रार केली होती.
रद्द केलेल्या अर्जाचा समावेश नाहीच
राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत बऱ्याच शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांनी ऑनलाइन अर्जात चुकीचे "गुगल लोकेशन' दाखवल्याची बाब उघडकीस आली. यामुळे बऱ्याच पालकांनी तक्रारी नोंदविल्यात. तपासणीत आढळलेल्या चुकीचे गुगल लोकेशनमुळे संबंधित पाल्याचा अर्ज रद्द ठरविण्यात आला आहे. या अर्जाचा विचार दुरुस्तीमध्ये करण्यात येऊ नये, असे बजावण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT