Accident
Accident sakal
विदर्भ

Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स ट्रकला मागून धडकली; २८ जण गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

कारंजा - ट्रॅव्हल्स ट्रकला मागून धडकल्याने घडलेल्या अपघातात २८ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना १ फेब्रुवारीला मध्यरात्रीनंतर साडे बारा वाजताच्या दरम्यान समृद्धी महामार्गावरील लोकेशन १७१ म्हणजेच कारंजा तालुक्यातील कार्ली गावाजवळ घडली. ही ट्रॅव्हल्स नागपूरहून पुणे येथे जात होती.

प्राप्त माहितीनुसार एम.एच. ४० बी. एच.९९६६ क्रमांकाची पूजा ट्रॅव्हल्स प्रवासी घेऊन नागपूरहून पुणे येथे जात असताना समृद्धी मार्गावरील लोकेशन १७१ जवळ ट्रॅव्हल्सची समोरील ट्रकला मागून धडक बसल्याने हा अपघात घडला. ट्रक चालकाच्या कथनानुसार ट्रकच्या एक नीलगाय आडवी आल्याने ट्रकचालकाने अचानकपणे ब्रेक मारले त्यामुळे मागून येणारी ट्रॅव्हल्स ट्रकला धडकली.

तर प्रवाशांच्या मते ट्रॅव्हल्स चालकाला झोपेची डुलकी आल्याने ट्रॅव्हल्स ट्रकला धडकल्याचे बोलल्या जात आहे. राजेश यादव, महेश भागरकर, दुर्योधन कटरे, निलेश वानखडे, समीर अदलाबादकर, निर्मला नागडे, रोहन तोडकर, प्रियंका तोडकर, शुभम भेंगरे, स्टीव डांटस, रुपेश धौनमोड, पंचशीला भगत, दिलीपकुमार चव्हाण, विशाल रेवतकर, मच्छिंद्रनाथ भगुतकर, प्रतीक्षा नासरे, मोनिका झोरे, कुश मिश्रा, वैभव शिवणकर, प्रिया मून, वेदांत कांबळे, कृष्णप्रकाश मिश्रा, सुवर्णा माळी, हेमंत फुलवळी, सुरज बावणे, निखिल तूरकर, पूजा तायडे व मयुरी जाधव असे २८ जण गंभीररित्या जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच १०८ कारंजाचे पायलट विधाता चव्हाण, डॉ. भास्कर आडे, शेलुबाजारचे पायलट उल्हास खिल्लारे, डॉ. सैफुद्दीन, शिवनी पायलट तुषार राजगिरे व डॉ. झाकीर श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख, किशोर खोडके, अनिकेत भेलांडे, अविनाश भोयर, श्याम घोडेस्वार व छोटू उके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी रुग्णांना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

यावेळी ग्रामीण पोलीस आणि अग्निक्षमन दलाचे कर्मचारी देखील घटनास्थळी उपस्थित होते. कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर जखमींना पुढील उपचारासाठी अकोला अमरावती व वर्धा येथे पाठविण्यात आले. दरम्यान कारंजा ग्रामीण पोलीस यांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT